दुबईतील गगनचुंबी इमारतीत आग...
By Admin | Updated: February 22, 2015 00:12 IST2015-02-22T00:12:06+5:302015-02-22T00:12:06+5:30
दुबईतील ‘टॉर्च टॉवर’ या गगनचुंबी इमारतीत शनिवारी भल्या सकाळी भीषण आग लागली.

दुबईतील गगनचुंबी इमारतीत आग...
दुबईतील ‘टॉर्च टॉवर’ या गगनचुंबी इमारतीत शनिवारी भल्या सकाळी भीषण आग लागली. मरिना भागातील या निवासी इमारतीत एकूण ७९ मजले असून ५० व्या मजल्यावर भडकलेली ही आग सकाळी पाच वाजता आटोक्यात आणण्यात यश आल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. जीवितहानीचे वृत्त नाही. आग लागल्याचे कळताच अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. अग्निशामक जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन शिताफीने शेकडो लोकांना सुरक्षित बाहेर काढले. या आगीत इमारतीचा ३३६.१ मीटर उंचीचा भाग खाक झाला. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.