लॉस एंजेलिस : लॉस एंजेलिस परिसरात जंगलात लागलेल्या भीषण आगीनंतर पुन्हा जोरदार वारे येण्याची शक्यता असल्याने अतिरिक्त पाण्याचे टँकर आणि मोठ्या संख्येने अग्निशमन दल पाठविण्यात आले आहे.
जंगलातील दोन मोठ्या आगींमध्ये या भागातील हजारो घरे नष्ट झाली आणि किमान २६ लोकांचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात दोन भीषण आगीच्या घटनांनंतर पाण्याचे स्रोत आटल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टँकर पाठवण्यात आले.सोमवारी रात्री उशिरा ते मंगळवारी सकाळपर्यंत वाऱ्याचा वेग वाढण्याची भीती आहे.
अग्निशमन अधिकाऱ्यांनी उच्च जोखीम असलेल्या भागातील रहिवाशांना धोका वाटत असल्यास घरे सोडण्याची सूचना केली असून, औपचारिक स्थलांतर आदेशांची वाट पाहू नये, असा सल्ला दिला आहे. आगीमुळे आतापर्यंत ४० हजार एकर वरील जंगल जळून खाक झाले असल्याचे सांगण्यात आले.