शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आंग सान सू की उत्तर राखिन प्रांताच्या दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 13:27 IST

म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर आंग सान सू की यांनी उत्तर राखिन प्रांताचा दौरा सुरु केला आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून उफाळलेल्या असंतोष, जाऴपोळीच्या सत्रानंतर आंग सान सू की यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत होती.

ठळक मुद्दे2012 पासून म्यानमारमधील राखिन प्रांतातील वांशिक दंगलीनंतर सू की पहिल्यांदाच या प्रांताच्या दौऱ्यावर जात आहेत. जाळपोळ करण्यात आलेल्या रोहिंग्यांच्या गावांमध्ये त्या जातील की नाही याबाबत अजूनही कोणतीही माहिती मिळालेली नाही.

मंडाले- म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर आंग सान सू की यांनी उत्तर राखिन प्रांताचा दौरा सुरु केला आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून उफाळलेल्या असंतोष, जाऴपोळीच्या सत्रानंतर आंग सान सू की यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत होती. सू  की या प्रकरणामध्ये कोणतीही भूमिका घेत नसून त्या रोहिंग्याच्या संरक्षणामध्ये कमी पडत आहेत अशी टीका त्यांच्यावर आंतररराष्ट्रीय समुदायाकडूनही होत होती.24 ऑगस्टपासून राखिन प्रांतातून 6 लाख रोहिंग्या बांगलादेशाच्या दिशेने पळाल्याचे सांगण्यात येते. म्यानमारच्या लष्कराकडून होणारी कथित कारवाई, बलात्कार, जाळपोळ आणि हत्या यांना घाबरून ते देश सोडून गेल्याचे सांगितले जाते. "स्टेट कौन्सिलर (आंग सान सू की) सित्वे येथे गेल्या असून त्या मंगडौ आणि बुथिंगडॉंग येथेही जातील", असे सरकारच्या प्रवक्त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले.2012 पासून म्यानमारमधील राखिन प्रांतातील वांशिक दंगलीनंतर सू की पहिल्यांदाच या प्रांताच्या दौऱ्यावर जात आहेत. जाळपोळ करण्यात आलेल्या रोहिंग्यांच्या गावांमध्ये त्या जातील की नाही याबाबत अजूनही कोणतीही माहिती मिळालेली नाही. रोहिंग्यांचे संरक्षण करण्यासाठी त्या कमी पडल्याबद्दल त्यांच्यावर विविध देशांनी टीका केली होती. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत न जाता सू की यांनी आपल्याच देशात मोठी परिषद घेऊन सरकार रोहिंग्यांसाठी काय करत आहेत याची माहिती सर्वांना दिली होती. सध्या बांगलादेशात गेलेल्या रोहिंग्यांना तेथे स्वच्छतेचे प्रश्न, शुद्धध पाणी तसेच औषधांचा तुटवडा अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठवड्यामध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांची भेट घेतल्यानंतर म्यानमारला आपल्या नागरिकांना माघारी बोलवावेच लागेल असे विधान केले होते.

डेस्मंड टूटू यांचे पत्रआंग सान सू की यांना दक्षिण आफ्रिकेचे आर्चबिशप डेस्मंड टूटू यांनी पत्र लिहून राखिन प्रांतात शांतता प्रस्थापित करावी अशी विनंती केली आहे. संपुर्ण जग तुला अन्यायाविरोधात लढणारी, स्वातंत्र्यासाठी लढणारी म्हणून आदर्श मानते. तुमच्या देशात चालू असलेला विवाद लवकर मिटवावा अशी अपेक्षा टूटू यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्या