‘तुमच्या देशात चालते व्हा,’ म्हणत भारतीयावर गोळीबार

By Admin | Updated: March 6, 2017 06:18 IST2017-03-06T06:18:42+5:302017-03-06T06:18:42+5:30

एका भारतीय व्यावसायिकावर झालेल्या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंट येथे एका शीख बांधवावर गोळीबार झाला

'Fill your country,' firing the Indian saying | ‘तुमच्या देशात चालते व्हा,’ म्हणत भारतीयावर गोळीबार

‘तुमच्या देशात चालते व्हा,’ म्हणत भारतीयावर गोळीबार


न्यूयॉर्क : अमेरिकत गेलेल्या भारतीयांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले असून, एका भारतीय व्यावसायिकावर झालेल्या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंट येथे एका शीख बांधवावर गोळीबार झाला. ‘तुमच्या देशात चालते व्हा,’ म्हणत एका माथेफिरूने त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात दीप राय (३९) हे जखमी झाले.
दीप राय हे शुक्रवारी वॉशिंग्टन प्रांताच्या केंटमध्ये आपल्या घराबाहेर वाहनाची दुरुस्ती करत होते. याच वेळी चेहरा झाकलेला एक व्यक्ती तिथे आला आणि दीप राय यांच्यावर गोळीबार केला. केंट पोलिसांनी तपास सुरू केला असून, या संदर्भात एफबीआय आणि इतर तपास संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
भारतीय आमच्यासाठी मौल्यवान
भारतीय आमच्यासाठी मौल्यवान आहेत. कान्सासमध्ये आम्ही त्यांचे स्वागत करतो, असे मत कान्सासचे राज्यपाल सॅम ब्रॉनबॅक यांनी व्यक्त केले आहे. भारतीय समुदायाच्या सदस्यांशी बोलताना ते म्हणाले की, एका व्यक्तीने द्वेषातून केलेले हे कृत्य आहे. मागील आठवड्यात भारतीय इंजिनीअर श्रीनिवास कुचीभोटला यांची हत्या झाली होती, या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. श्रीनिवास यांच्या हत्येनंतर भारतीय समुदायासह अन्य वर्गातूनही संताप व्यक्त होत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Fill your country,' firing the Indian saying