पाकिस्तानात विमानावर गोळीबार, १ ठार

By Admin | Updated: June 25, 2014 12:07 IST2014-06-25T11:42:53+5:302014-06-25T12:07:12+5:30

पाकिस्तानमधील पेशावर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान लँड करत असताना एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात एक महिला ठार झाली.

Fighter in Pakistan, 1 killed | पाकिस्तानात विमानावर गोळीबार, १ ठार

पाकिस्तानात विमानावर गोळीबार, १ ठार

>ऑनलाइन टीम
पेशावर, दि. २५ - पाकिस्तानमधील पेशावर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान लँड करत असताना एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात एक महिला ठार झाली. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेत तीन जम जखमीही झाले आहेत. पाकिस्तानात विमानतळावर झालेल्या हल्ल्याची महिनाभरातील ही तिसरी घटना आहे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरबवरून १७८ प्रवाशांना घेऊन येणारे विमान धावपट्टीवर उतरत असतानाचा एका व्यक्तीने विमानाच्या दिशेने गोळीबार केला. विमानतळाबाहेर लपलेल्या त्या हल्लेखोराने विमानाच्या दिशेने सहा गोळ्या झाडल्या, त्यातील एक गोळी त्या महिलेच्या डोक्यात घुसली व ती जागीच ठार झाली. तर वैमानिक थोडक्यात बचावला. आणखी तीन प्रवासी हल्ल्यात जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.  
 

Web Title: Fighter in Pakistan, 1 killed