विमानाचा पाचवा तुकडाही मिळाला
By Admin | Updated: January 5, 2015 03:59 IST2015-01-05T03:59:12+5:302015-01-05T03:59:12+5:30
सिंगापूर- एअर एशियाच्या अपघातग्रस्त विमानाच्या सांगाड्याचा मोठा तुकडा आज शोध सदस्यांच्या हाती लागला असून,

विमानाचा पाचवा तुकडाही मिळाला
जकार्ता : सिंगापूर- एअर एशियाच्या अपघातग्रस्त विमानाच्या सांगाड्याचा मोठा तुकडा आज शोध सदस्यांच्या हाती लागला असून, आणखी एक मृतदेह वर काढण्यात आला आहे; पण खराब हवेमुळे विमानाच्या फ्युजलेजपर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे. त्यामुळे विमानात अडकलेले मृतदेह तसेच ब्लॅकबॉक्स मिळालेला नाही.
एअर एशियाच्या फ्लाईट क्रमांक क्यूझेड ८५०१ या विमानाला अपघात होऊन आता दुसरा आठवडा सुरू झाला आहे. या विमानाचा अपघात का झाला हे सांगणारा ब्लॅकबॉक्स शोधण्यासाठी आज पिंजर लोकेटर लावण्यात आला आहे. रविवारी सकाळी ७.५८ वाजता शोध पथकाला एक मृतदेह सापडला असून, त्यामुळे या दुर्दैवी विमानातील ३१ मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत.