शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जपानच्या समुद्रात भीषण ज्वालामुखी उद्रेक; काही मिनिटांत नवीन बेटाची निर्मिती, पाहा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 20:43 IST

ज्वालामुखीमुळे बेट तयार झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Japan Volcano Eruption : पृथ्वीवर अनेक ठिकाणी ज्वालामुखी उद्रेकानंतर नवीन बेटांची निर्मिती झाली आहे. पण, तुम्ही कधी हे बेट तयार होताना पाहिले आहे का? सोशल मीडियावर एक व्हिडओ व्हायरल होत आहे, ज्यात ज्वालामुखी उद्रेकामुळे काही मिनिटांत नवीन बेट तयार झाल्याचे दिसत आहे. ही घटना जपानच्या समुद्रात घडली. 

जपानची राजधानी टोकियोच्या दक्षिणेस 1000 किमी अंतरावर असलेल्या प्रशांत महासागरात पाण्याखालील ज्वालामुखीचा उद्रेक झाला. उद्रेक एवढा भीषण होता की, त्यातून काही मिनिटांत नवीन बेट तयार झाले. या बेटाचा आकार किमान 200 मीटर लांब आहे. हे बेट इवोटो बेटाच्या किनाऱ्यापासून थोडे दूर आहे. पूर्व इवोटोला इवोजिमा म्हणतात. 1 नोव्हेंबर रोजी झालेल्या ज्वालामुखी उद्रेकामुळे या बेटाची निर्मिती झाली. 

पाहा व्हिडिओ-

इवोटोवर सध्या जपानी नौदलाचा एअरबेस आहे. याचा दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. बेटावरील नौसैनिकांनी सांगितले की, त्यांना सुरुवातीला मोठा आवाज ऐकू आला, यानंतर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बेट तयार झाल्याचे पाहिले. जपानच्या हवामान खात्याने सांगितले की, 21 ऑक्टोबरपासून इवातो बेटाच्या आसपास सौम्य भूकंपही येत आहेत. पण पाण्याखालील ज्वालामुखीचा उद्रेक होईल, असे वाटले नव्हते.

जपानमध्ये अनेक ज्वालामुखी बेटेयापूर्वीही जपानच्या आजूबाजूला काही बेटे निर्माण झाली होती, पण खराब हवामानामुळे ती गायब झाली. आता जिथे नवीन बेट तयार झाले आहे, तिथे 1986 मध्ये असेच बेट तयार झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत येथे एकही बेट तयार झाले नव्हते. आता हे बेट किती दिवस टिकणार, हे येणाऱ्या काळात कळेल.

जपानच्या आसपास 7000 नवीन बेटे या वर्षाच्या सुरुवातीलाच जपानच्या आजूबाजूच्या भागांचा अभ्यास करून नकाशा तयार करण्यात आला होता. ज्यामध्ये 7000 नवीन बेटांचा शोध लागला. अशा प्रकारचे सर्वेक्षण 35 वर्षात प्रथमच करण्यात आले. मात्र, या नवीन बेटाच्या निर्मितीमुळे जपानच्या सीमांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणने आहे.

टॅग्स :JapanजपानVolcanoज्वालामुखीInternationalआंतरराष्ट्रीयSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया