शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

धक्कादायक! महिला सब-इन्स्पेक्टरला दिवसाढवळ्या किडनॅप केलं, रेप करून पोलीस स्टेशनजवळ फेकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 12:20 IST

लैंगिक गुन्हे अधिकारी म्हणून काम करणारी महिला सब इन्स्पेक्टरला ती केस संदर्भात घटनास्थळी गेली असताना किडनॅप केलं होतं.

इमरान खानच्या 'नव्या पाकिस्तानात' सामान्य महिला तर सोडात खाकी वर्दीतील महिलाही सुरक्षित नाही, याचं उदाहरण दाखवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबच्या मुजफ्फरगढ जिल्ह्यात एका महिला सब इन्स्पेक्टरचं अपहरण करून तिच्या रेप करण्यात आला. लैंगिक गुन्हे अधिकारी म्हणून काम करणारी महिला सब इन्स्पेक्टरला ती केस संदर्भात घटनास्थळी गेली असताना किडनॅप केलं होतं. पोलिसांनी आरोपी विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

डॉनच्या रिपोर्टनुसार, २९ वर्षीय सब इन्स्पेक्टरला सिटी पोलीस स्टेशनजवळ एका केसची चौकशी करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. ती तिथे पोहोचल्यावर तिथे आधीच उपस्थित असलेल्या व्यक्तीने पिस्तुलचा धाक दाखवत तिला कारमध्ये बसवलं आणि चमन बायपास भागातील एका निर्जन स्थळी घेऊन गेला.  (हे पण वाचा : Afghanistan Taliban Crisis : तालिबानचा क्रूर चेहरा उघड! कुटुंबीयांसमोरच गर्भवती महिला पोलिसावर झाडल्या गोळ्या)

आरोपीने इथे महिला सब इन्स्पेक्टरसोबत मारहाण केली आणि नंतर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी महिलेला बेशुद्धावस्थेत ऑफिसच्या जवळ फेकून फरार झाला. पोलिसांनी सांगितलं की,  सब-इन्स्पेकटरला जखमी स्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तसेच आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून घटनेसाठी वापरलेली कारही ताब्यात घेतली आहे. सूत्रांनी सांगितलं की आरोपी इतरही अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे.

दुसऱ्या घटनेत मुलासोबत गॅंग रेप

एका दुसऱ्या घटनेत चौक सरवर शहीद भागात एका नऊ वर्षाच्या मुलासोबत तीन संशयितांनी गॅंगरेप केला. मुलगा क्रिकेट खेळण्यासाठी शासकीय हायस्कूलच्या स्पोर्ट्स फिल्डमध्ये गेला होता. तेथून परत येत असताना त्याला किडनॅप केलं आणि त्याच्यावर गॅंगरेप केला. त्यानंतर मुलाला तिथेच सोडून आरोपी फरार झाले. पीडित मुलाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.   

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSexual abuseलैंगिक शोषणCrime Newsगुन्हेगारी