पोप यांनी धुतले तीन मुस्लिमांचे पाय

By Admin | Updated: March 26, 2016 01:09 IST2016-03-26T01:09:32+5:302016-03-26T01:09:32+5:30

ब्रसेल्समधील हल्ल्यानंतर मुस्लिमविरोधी भावना भडकल्या असतानाच पोप फ्रान्सिस यांनी मुस्लिम, ख्रिश्चन आणि हिंदू ही एकाच ईश्वराची लेकरे असल्याचे सांगत

The feet of three Muslims washed by the Pope | पोप यांनी धुतले तीन मुस्लिमांचे पाय

पोप यांनी धुतले तीन मुस्लिमांचे पाय

कॅसलनुओवो दी पोर्तो : ब्रसेल्समधील हल्ल्यानंतर मुस्लिमविरोधी भावना भडकल्या असतानाच पोप फ्रान्सिस यांनी मुस्लिम, ख्रिश्चन आणि हिंदू ही एकाच ईश्वराची लेकरे असल्याचे सांगत या तिन्ही धर्मांच्या विस्थापितांचे पाय धुतले आणि त्यांचे चुंबन घेतले.
रोमजवळील कॅसलनुओवो दी पोर्तो येथील विस्थापितांच्या एका छावणीमध्ये इस्टर करून पोप यांनी प्रार्थनासभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी ब्रसेल्स हल्ल्याचा निषेध केला आणि शस्त्रास्त्र उद्योगांच्या कृपेने रक्ताची तहान लागलेल्या लोकांनी हे हत्याकांड घडवून आणल्याचे उद्विग्न उद्गार पोप यांनी काढले. (वृत्तसंस्था)

Web Title: The feet of three Muslims washed by the Pope