शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
7
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
8
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
9
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
10
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
11
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
12
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
13
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
14
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
15
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
16
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
17
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
18
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
19
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
20
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी

२०२५मध्ये अमेरिका, चीनच्या युद्धाची भीती, अमेरिकी हवाई दलाच्या जनरलचे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 07:20 IST

China-US War: २०२५ साली अमेरिका व चीनमध्ये युद्ध होण्याची शक्यता अमेरिकी हवाई दलाचे जनरल माईक मिनिहन यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकी हवाई दलातील अधिकाऱ्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी हा उल्लेख केला आहे.  

वॉशिंग्टन : २०२५ साली अमेरिकाचीनमध्येयुद्ध होण्याची शक्यता अमेरिकी हवाई दलाचे जनरल माईक मिनिहन यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकी हवाई दलातील अधिकाऱ्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी हा उल्लेख केला आहे.

अमेरिका- चीनच्या संभाव्य युद्धासंदर्भात मिनिहन यांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची खासगी मते आहेत, अशी प्रतिक्रिया  अमेरिकेच्या एका लष्करी अधिकाऱ्याने व्यक्त केली. तैवानचा कब्जा घेण्यासाठी चीनने सुरू केलेल्या आक्रमक हालचालींमुळे अमेरिका अस्वस्थ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मिनिहन यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. त्यांनी म्हटले आहे की, दोन वर्षांनंतर अमेरिका- चीन यांच्यात युद्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, हे भाकीत खोटे ठरावे, अशी माझी इच्छा आहे.

संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी याआधी सांगितले होते की, तैवानवर चीनने आक्रमण केल्यास अमेरिका लष्करी हस्तक्षेप करेल, असा इशारा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सरकारने दिला होता. (वृत्तसंस्था)

अमेरिका-भारत संबंध पुरेसे बळकट नाहीतअमेरिका व भारताचे संबंध अद्यापही पुरेसे बळकट नाहीत. दोन्ही देशांतील आर्थिक संबंध आणखी दृढ होण्याची गरज असून त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. भारत-अमेरिकेतील जनतेमध्ये सहकार्य वाढीस लागल्यास त्याचा या देशांना फायदा होईल.- श्रीनिवास ठाणेदार, अमेरिकी काँग्रेसचे सदस्य

क्षेपणास्त्रांच्या माऱ्याच्या टप्प्यात चीनची शहरे   चीनमधील बहुतांश शहरे आता भारतीय क्षेपणास्त्रांच्या माऱ्याच्या टप्प्यात आली आहेत, असे फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट (एफएएस) या संघटनेच्या एका अहवालात म्हटले आहे. भारताने आता पाकिस्तान नव्हे तर चीनला डोळ्यासमोर ठेवून आपल्या अणुधोरणात मोठे बदल केले आहेत. भारताकडे सध्या १६० अण्वस्त्रे आहेत. नव्या क्षेपणास्त्रांसाठी आणखी अण्वस्त्रे बनविण्याची त्या देशाला गरज भासू शकते, असेही या अहवालात म्हटले आहे. 

टॅग्स :United Statesअमेरिकाchinaचीनwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीय