बॉम्बच्या भीतीने दोन विमानांचा मार्ग बदलला

By Admin | Updated: November 19, 2015 03:43 IST2015-11-19T03:43:22+5:302015-11-19T03:43:22+5:30

विमानात बॉम्ब ठेवल्याच्या भीतीने अमेरिकेहून पॅरिसला जाणाऱ्या एअर फ्रान्सच्या दोन विमानांचा मार्ग बदलण्यात आला. ही दोन्ही विमाने सुरक्षित उतरली; मात्र

The fear of the bomb changed the way of two planes | बॉम्बच्या भीतीने दोन विमानांचा मार्ग बदलला

बॉम्बच्या भीतीने दोन विमानांचा मार्ग बदलला

लॉस एंजिल्स : विमानात बॉम्ब ठेवल्याच्या भीतीने अमेरिकेहून पॅरिसला जाणाऱ्या एअर फ्रान्सच्या दोन विमानांचा मार्ग बदलण्यात आला. ही दोन्ही विमाने सुरक्षित उतरली; मात्र या विमानात काहीही सापडले नाही.
लॉस एंजिल्स येथून निघालेल्या फ्लाईट ६५ आणि वॉशिंग्टन येथून निघालेल्या फ्लाईट ५५ या दोन्ही विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी अज्ञात लोकांनी दिल्यामुळे त्यांचा मार्ग बदलण्यात आल्याचे एअरलाईन्सतर्फे सांगण्यात आले.
पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १२९ जण ठार झाले होते. त्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडली. ही दोन्ही विमाने सुरक्षित उतरली असून, त्यांची कसून झडती घेण्यात येत असल्याचे एअर फ्रान्सतर्फे सांगण्यात आले.
लॉस एंजिल्स येथून निघालेले विमान मार्ग बदलून युटा येथे सॉल्ट लेक येथे उतरविण्यात आले. वॉशिंग्टन येथून निघालेले विमान कॅनडातील हॅलीफॅक्स येथे वळविण्यात आले.

Web Title: The fear of the bomb changed the way of two planes