भूमध्य सागरात बोट बुडाली, 700 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
By Admin | Updated: April 19, 2015 15:55 IST2015-04-19T15:22:53+5:302015-04-19T15:55:25+5:30
भूमध्य सागरात लिबियाच्या किनारपट्टीजवळ बोट बुडाली असून या दुर्घटनेत बोटीतील सुमारे 700 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे.

भूमध्य सागरात बोट बुडाली, 700 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
ऑनलाइन लोकमत
रोम, दि. 19 - भूमध्य सागरात लिबियाच्या हद्दीत बोट बुडाली असून या दुर्घटनेत बोटीतील सुमारे 700 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. या घटनेनंतर इटली व अन्य देशांचे पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
भूमध्य सागरात इटलीच्या दक्षिणेकडील लम्पेदुसा बेटाजवळ लिबियाच्या हद्दीत प्रवाशांनी खचाखच भरलेली एक बोट शनिवारी रात्री बुडाली. या जहाजातील फक्त 28 प्रवाशांची सुटका करण्यात यश आले. तर सुमारे 700 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती संयुक्त राष्ट्राच्या एका अधिका-याने वर्तवली आहे. मृतांचा नेमका स्पष्ट झाल्यास हा दशकातील सर्वात मोठा अपघात ठरु शकतो असे जाणकारांनी सांगितले. या अपघाताविषयी इटलीच्या नौदलाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या आठवड्यातही भूमध्य सागरात लिबियातून येणारी बोट बुडून 400 जणांचा मृत्यू झाला होता.