शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या वडिलांची किडनी मुलाला देता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 17:34 IST

प्रत्यारोपण शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्याने मुलाचा जीव धोक्यात. डॉक्टरांच्या निर्णयाने पालक चिंताग्रस्त.

ठळक मुद्दे ऑक्टोबर रोजी ही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यासाठी सर्व तयारीही करण्यात आली होती. त्याच्या जन्मापासून तो जगण्यासाठी संघर्ष करतोय. त्याला नेहमी होणाऱ्या यातना आम्हाला पाहवत नव्हत्या.माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलाला का देण्यात येत आहे. आधीच तो आजारी आहे. 

अॅटलांटा- वडिलांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असल्याने ते आपल्या मुलाला किडनी देऊ शकत नसल्याचा एक निकाल अॅटलंटामध्ये देण्यात आला. जन्मापासूनच एका चिमुकल्याला किडनीचा त्रास होता. त्यामुळे त्याची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यासाठी त्या चिमुकल्याच्या वडिलांनी आपली किडनी देण्याचा निर्णय घेतला. पण वडिलांची पार्श्वभूमी गुन्हेगाराची असल्याकारणाने ही शस्त्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

ए.जे.डिकरसन असं या चिमुकल्याचं नाव असून तो आता दोन वर्षांचा आहे. त्याच्या जन्म झाला तेव्हापासूनच त्याला किडनी नव्हती, असं अॅटलंटामधील डॉक्टरांनी सांगितलं. चिमुकल्याची आई  कॅरमेलिओ बर्गस याविषयी बोलताना म्हणाली की,‘हा दोन वर्षीय मुलगा त्याच्या जन्मापासून तो जगण्यासाठी संघर्ष करतोय. त्याला नेहमी होणाऱ्या यातना आम्हाला पाहवत नव्हत्या. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यासाठी त्याच्या वडीलांनी स्वत:ची किडनी देण्याचीही तयारी दाखवली. त्यांची किडनी माझ्या मुलाला १०० टक्के सुट होत असल्याने वापरता येणार  होती, मात्र तरीही असा निर्णय घेण्यात आल्याने आम्ही फार दु:खी झालो आहोत.’

३ ऑक्टोबर रोजी ही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यासाठी सर्व तयारीही करण्यात आली होती. मात्र नंतर डॉक्टरांना समजलं की, ज्यांच्याकडून किडनी घेण्यात येणार आहे त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड सापडला आहे. म्हणजेच  गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने ते हे प्रत्यारोपण करू शकणार नाहीत. शस्त्रक्रियेच्या शेवटच्या मिनिटाला ही शस्त्रक्रिया रद्द करण्यात आली. 

काही  दिवसांपूर्वी डिकरसन यांना अवैध शस्त्र हाताळल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आपल्या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना पॅरोलवर सोडण्यात आलं आहे.डिकरसन म्हणतात की, ‘माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलाला का देण्यात येत आहे. आधीच तो आजारी आहे आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आधीच खूप उशीर झाला असल्याचं डॉक्टरांनीच सांगितलंय. त्यात ही शस्त्रक्रिया पुढे ढकलल्याने त्याच्या जीवाला धोका वाढला आहे.

किडनी प्रत्यारोपणासाठी वडिलांची किडनी १०० टक्के मॅच होत असल्याने संपूर्ण कायदेशीर नियमांची अंमलबजावणी करून पून्हा जानेवारी २०१८ मध्ये प्रत्यारोपण करण्यात येईल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. 

सौजन्य - www.mirror.co.uk

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCrimeगुन्हा