बापरे! तिने इसिसच्या दोन दहशतवाद्यांचे शीर कापून चक्क शिजवले
By Admin | Updated: October 1, 2016 17:11 IST2016-10-01T17:07:11+5:302016-10-01T17:11:55+5:30
इसिस संघटनेतील दहशतवाद्यांनी अनेकांची निर्घृण हत्या केल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. मात्र, याच संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना ठार करुन एका महिलेने त्यांचे शीर चक्क शिजवले.

बापरे! तिने इसिसच्या दोन दहशतवाद्यांचे शीर कापून चक्क शिजवले
ऑनलाइन लोकमत
बगदाद, दि.1-इसिस संघटनेतील दहशतवाद्यांनी अनेकांची निर्घृण हत्या केल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. मात्र, याच संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना ठार करुन एका महिलेने त्यांचे शीर चक्क शिजवले. इराकची राजधानी बगदादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. वहिदा मोहम्मद अल-जुलइली,असे या महिलेचे नाव आहे. इसिस संघटनेच्या दहशतवाद्यांनी या महिलेचे दोन पती, तीन भाऊ आणि वडिलांची हत्या केली होती. त्याचा सूड अखेर तिने अशा पद्धतीने घेतल्याचे बोलले जात आहे. तिने दोन दहशतवाद्यांचा खात्मा करुन त्यांचे शीर धडापासून वेगळे केले. त्यानंतर त्यांचे शीर चक्क शिजवले आणि धड जाळले, अशी माहिती तिने स्वतः दिली आहे. दहशतवाद्यांचे धडापासून वेगळे केलेले शीर हातात घेतलेला फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.