प्रसिद्ध भारतीय अमेरिकी डॉक्टरची मित्राकडूनच हत्या
By Admin | Updated: June 16, 2015 02:24 IST2015-06-16T02:24:16+5:302015-06-16T02:24:16+5:30
प्रसिद्ध भारतीय अमेरिकी हृदय शल्यचिकित्सक सुरेश गदासल्ली यांची त्यांच्या मित्राने गोळ््या घालून हत्या केल्यानंतर स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली.

प्रसिद्ध भारतीय अमेरिकी डॉक्टरची मित्राकडूनच हत्या
ह्युस्टन : प्रसिद्ध भारतीय अमेरिकी हृदय शल्यचिकित्सक सुरेश गदासल्ली यांनी त्यांच्या मित्राने गोळ््या घालून हत्या केल्यानंतर स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली. टेक्सास प्रांतातील ओडेसा येथे हा थरार घडला. डॉ. गदासल्ली यांनी हृदयरुग्णावर जगातील पहिले सिमल्टेनिअस् हायब्रिड रिव्हॅस्कूलरायजेशन (एक प्रकारची शस्त्रक्रिया) केले होते.
गदासल्ली (५३) यांचे मित्र व रुग्ण अय्यासामी थंगम (६०) यांनी हेल्थी हार्ट सेंटर येथे गुरुवारी त्यांना गोळ््या घातल्या, असे ओडेसा पोलीस विभागाने म्हटले आहे. हे दोघे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि व्यावसायिक भागीदार होते. डॉ. गडासल्ली हे मूळचे कर्नाटकचे होते. बेळगावच्या जवाहरलाल नेहरूवैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेत पुढील शिक्षण घेतले. १९९४ मध्ये ओडेसा येथील मेडिकल सेंटर हॉस्पिटलमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. (वृत्तसंस्था)
डॉ. गदासल्ली यांनी २००५ मध्ये एका रुग्णावर जगातील पहिले सिमल्टेनिअस् हायब्रिड रिव्हॅस्कूलरायजेशन केले होते. या शस्त्रक्रियेत एकाचवेळी बायपास आणि स्टेंट बदलण्याच्या प्रक्रियेचा समावेश होता व रोबोट प्रणालीचा वापर करून ती करण्यात आली होती.