शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या इभ्रतीसाठी प्रेमविवाह केलेल्या दांपत्याला विजेचा शॉक देऊन कुटुंबियांनी केलं ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 16:03 IST

कराचीमध्ये एका अल्पवयीन दांपत्याला कुटुंबातील सदस्यांनी विजेचा शॉक देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दांपत्याला आधी खाटेला बांधण्यात आलं, त्यानंतर विजेचा शॉक देण्यात आला. 

ठळक मुद्देकराचीमध्ये एका अल्पवयीन दांपत्याला कुटुंबातील सदस्यांनी विजेचा शॉक देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना दांपत्याला आधी खाटेला बांधण्यात आलं, त्यानंतर विजेचा शॉक देण्यात आलापोलिसांनी हत्येप्रकरणी काहीजणांना अटक केली आहे, मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत

कराची, दि. 14 - पाकिस्तानात आपल्या खोट्या इभ्रतीसाठी होणा-या हत्येचं अजून एक प्रकरण समोर आलं आहे. कराचीमध्ये एका अल्पवयीन दांपत्याला कुटुंबातील सदस्यांनी विजेचा शॉक देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाचं वय 18 वर्ष होतं, तर तरुणी 16 वर्षांची होती अशी माहिती मिळाली आहे. पोलीस अधिकारी अमानुल्ला मारवात यांनी दिलेल्या माहितीनुसार, दांपत्याला आधी खाटेला बांधण्यात आलं, त्यानंतर विजेचा शॉक देण्यात आला. 

पोलीस अधिकारी अमानुल्ला मारवात यांनी सांगितल्यानुसार, 'कराचीमधील इब्राहिम हैदरी परिसरातील 16 वर्षीय तरुणी आपल्या 18 वर्षांच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. शेवटी दोन्ही कुटुंबानी निर्णय घेत आम्ही तुमच्या लग्नासाठी तयार आहोत असं सागंत दोघांनाही घरी परत येण्यासाठी तयार केलं. दोघेही परतले असता त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आणि विजेचा शॉक देऊन त्यांची हत्या करण्यात आली'.

'अधिका-यांनी कबर खोदून दांपत्याचा मृतदेह बाहेर काढला', असं अमानुल्ला मारवात यांनी सांगितलं आहे. बुधवारी मृतदेहांचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. पोस्टमॉर्टममध्ये विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, आधी तरुणीला पुरण्यात आलं, त्यानंतर एका दिवसाने तरुणाची हत्या करण्यात आली. 

पोलिसांनी हत्येप्रकरणी काहीजणांना अटक केली आहे, मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. 

हिंदू, मुस्लिम एकत्र राहणं अमान्य, दांपत्याला रुम देण्यास हॉटेलचा नकारबंगळुरुत केरळमधील एका दांपत्याला त्यांचा धर्म वेगळा असल्याने रुम नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. शफीक शुबैदा हक्कीम आणि दिव्या असं या दांपत्याचं नाव आहे. ते केरळचे राहणारे आहेत. बंगळुरुमधील सुदामा नगर येथे अन्निपुरम मेन रोडवर असणा-या ऑलिव्ह रेसिडेन्सी हॉटेलमध्ये हा विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला होता. दांपत्याने दिलेल्या माहितीनुसार, रिसेप्शनिस्टने दोघांचेही ओळखपत्र पाहिल्यानंतर रुम नाकारली असल्याचा दावा केला होता. 

"त्याने आमची नावं रजिस्टरवर नोंद केली असता मी मुस्लिम असून, माझी पत्नी हिंदू असल्याचं त्याच्या लक्षात आलं. आम्हा दोघांचाही धर्म वेगळा असल्याने तुम्ही विवाहित आहात का अशी चौकशी त्याने केली. आम्ही रितसर पद्धतीने लग्न केलं असल्याचं त्याला सांगितलं. यानंतर त्याने आम्हाला रुम देण्यास थेट नकार दिला. हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहणं मान्य नसल्याचं सांगत त्याने रुम देऊ शकत नाही सांगितलं", अशी माहिती शफीक शुबैदा हक्कीम यांनी दिली होती. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानMurderखूनPoliceपोलिस