लॉस एंजेल्स विमानतळावर गोळीबाराची अफवा
By Admin | Updated: August 29, 2016 11:36 IST2016-08-29T11:30:20+5:302016-08-29T11:36:49+5:30
लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकही गोळी झाडली गेलेली नसून, तिथे एकही बंदुकधारी नसल्याचे असे लॉस एंजेल्स पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

लॉस एंजेल्स विमानतळावर गोळीबाराची अफवा
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २९ - लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकही गोळी झाडली गेलेली नसून, तिथे एकही बंदुकधारी नसल्याचे लॉस एंजेल्स पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सोमवारी सकाळी लॉस एंजेल्स विमानतळावर गोळीबार झाल्याच्या वृत्तामुळे एकच गोंधळ उडाला होता.
विमानतळावर झालेला मोठा आवाज गोळीबार असल्याचा लोकांचा समज झाला असे लॉस एंजेल्स पोलिस दलाचे प्रवक्ते अँडी नीमॅन यांनी सांगितले. पोलिसांनी गोळीबार झाला नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर विमातळावरची स्थिती सामान्य झाली.
यापूर्वी गोळीबाराच्या अफवेमुळे लोक विमातळावरुन बाहेरच्या दिशेला पळत असल्याचे फोटो सोशल मिडियावर प्रसिद्ध झाले होते.