अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप खोटा - डोनाल्ड ट्रम्प
By Admin | Updated: April 29, 2016 13:34 IST2016-04-29T13:34:59+5:302016-04-29T13:34:59+5:30
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी धुडकावला आहे

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप खोटा - डोनाल्ड ट्रम्प
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 29 - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी धुडकावला आहे. एका महिलेने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे दावेदार ट्रम्प यांच्यावर ती अल्पवयीन असताना बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. 1994मध्ये ट्रम्प यांनी त्यांच्या न्यू यॉर्कमधल्या निवासस्थानी बलात्कार केला होता, असा तिचा आरोप आहे.
जेफ्री एप्सटीन या गुन्हा सिद्ध झालेल्या विकृतासोबत ट्रम्प सहभागी होते असा आरोप आहे. या गंभीर आरोपाचा व्हाईट हाऊस काबीज करण्याच्या ट्रम्प यांच्या आकांक्षेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. हे सगळे आरोप धादांत असत्य असल्याचे ट्रम्प यांनी आपल्या बचावात म्हटले आहे.
इंग्लंडमधल्या मिररने हे वृत्त दिले असून या महिलेने कोर्टामध्ये आपली ओळख केट जॉन्सन अशी दिल्याचे नमूद केले आहे आणि कोर्टामध्ये आपली बाजू ती लावून धरणार असल्याचे म्हटले आहे.