बनावट विवाह; १० भारतीयांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 05:16 IST2018-12-06T05:16:47+5:302018-12-06T05:16:48+5:30
थायलंडमध्ये स्थायिक झालेल्या पती/पत्नीच्या व्हिसाची मुदत वाढवून मिळण्यासाठी बनावट विवाह दाखविण्याचे एक रॅकेट उजेडात आले आहे.

बनावट विवाह; १० भारतीयांना अटक
बँकॉक : थायलंडमध्ये स्थायिक झालेल्या पती/पत्नीच्या व्हिसाची मुदत वाढवून मिळण्यासाठी बनावट विवाह दाखविण्याचे एक रॅकेट उजेडात आले आहे. याप्रकरणी १० भारतीय तसेच थायलंडमधील २४ महिलांना अटक झाली आहे. आणखी २० भारतीय व थायलंडच्या सहा महिलांचा पोलीस शोध घेत आहेत.
केवळ १५ ते १५२ डॉलर इतका मोबदला देऊन स्थानिक महिलांना या गैरप्रकारांसाठी राजी केले गेले
होते.