शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी हात जोडून मागितली हिंदू समाजाची माफी; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 16:40 IST

Attacks on Hindus in Bangladesh : अनेक हिंदू मंदिरे, घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड करण्यात आली. याबाबत आता बांगलादेशचे नवे गृह सल्लागार (गृहमंत्री) सखावत हुसेन यांनी रविवारी हिंदू समुदायाचे पुरेसे संरक्षण न केल्याबद्दल त्यांची माफी मागितली.

Attacks on Hindus in Bangladesh : काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्यावरुन बांगलादेशात असंतोष पसरला होता. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेनं उठाव केला होता. यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की, शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. शेख हसीना सध्या भारतात आश्रयाला आल्या आहेत. या घटनेनंतर आता बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. असं असलं तरी येथील परिस्थिती अद्याप  नियंत्रणाबाहेर आहे. जमावाकडून देशात अनेक हिंदू समुदायावर हल्ले करण्यात आले. 

अनेक हिंदू मंदिरे, घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड करण्यात आली. याबाबत आता बांगलादेशचे नवे गृह सल्लागार (गृहमंत्री) सखावत हुसेन यांनी रविवारी हिंदू समुदायाचे पुरेसे संरक्षण न केल्याबद्दल त्यांची माफी मागितली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिंदू अल्पसंख्याकांचं संरक्षण करणं हे मुस्लिम बहुसंख्यांचे कर्तव्य आहे, असं सखावत हुसेन म्हणाले. तसंच, या जबाबदारीत त्यांनी अपयशाची कबुली दिली. त्यांनी भविष्यात समुदायाला सुरक्षिततेचं आश्वासन दिले आणि सुधारणेची आशा व्यक्त केली.

याशिवाय, गुरुवारी रात्री सदस्यांच्या शपथविधीनंतर अंतरिम सरकारच्या मंत्रिमंडळानं रविवारी अल्पसंख्याकांवरील हिंसाचारावर पहिली प्रतिक्रिया दिली. काही ठिकाणी धार्मिक अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांकडे गंभीर चिंतेनं पाहिलं जात आहे," असं मंत्रिमंडळानं निवेदनात म्हटलं आहे. तसंच, मंत्रिमंडळानं असं म्हटलं आहे की, अशा प्रकारच्या घृणास्पद हल्ल्यांचे निराकरण करण्याचे मार्ग शोधण्यासाठी ताबडतोब प्रतिनिधी संस्था आणि इतर संबंधित गटांसोबत बैठक घेतली जाईल.

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, शेख हसीना यांनी गेल्या सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशी हिंदूंना हिंसाचार आणि लूटमारीचा सामना करावा लागत आहे. अनेक हिंदू मंदिरे, घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड करण्यात आली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाशी संबंधित किमान दोन हिंदू नेते या हिंसाचारात ठार झाले आहेत.

हिंदू समाजाची निदर्शनेदरम्यान, बांगलादेशची राजधानी ढाका आणि ईशान्येकडील बंदर शहर चितगाव येथे अल्पसंख्याक हिंदू समाजाच्या हजारो लोकांनी प्रचंड निदर्शने केली. देशभरातील मंदिरे, त्यांची घरे आणि व्यवसायांवर हल्ले होत असताना त्यांनी सुरक्षेची मागणी केली. अल्पसंख्याकांवर अत्याचार करणाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापन करावे, अल्पसंख्याकांसाठी १० टक्के संसदीय जागा, अल्पसंख्याक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी आंदोलन करणारे हिंदू समाजाचे लोक होते.

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय