फेसबुकवर लवकरच प्रोफाईल व्हिडीओ दिसणार
By Admin | Updated: December 23, 2015 17:45 IST2015-12-23T17:34:37+5:302015-12-23T17:45:31+5:30
सोशल नेटवर्किंगच्या जगात अग्रेसर असलेले फेसबुक आता आपल्या युजर्संसाठी नवीन फ्युचर्स आणणार आहे. युजर्संना फेसबुक अॅपवर प्रोफाईल फोटोच्या जागी आता प्रोफाईल म्हणून

फेसबुकवर लवकरच प्रोफाईल व्हिडीओ दिसणार
>ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. २३ - सोशल नेटवर्किंगच्या जगात अग्रेसर असलेले फेसबुक आता आपल्या युजर्संसाठी नवीन फ्युचर्स आणणार आहे. युजर्संना फेसबुक अॅपवर प्रोफाईल फोटोच्या जागी आता प्रोफाईल म्हणून व्हिडीओ सुद्धा अपलोड करता येणार आहेत.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात ह्या प्रोफाईल व्हिडीओ संदर्भात फेसबुककडून घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार त्याची चाचणी घेण्यात आली. मात्र ही फेसबुक अॅपची सुविधा फक्त अॅन्ड्राईड आणि आय-फोन असलेल्या युजर्संनाच वापरता येणार आहे. सध्या अपडेट असलेल्या अॅन्ड्राईड फोनच्या नवीन फेसबुक अॅपवर प्रोफाईल फोटो बदलण्याचा जागी क्लिक केल्यास त्यामध्ये 'कमिंग सून:प्रोफाईल व्हिडीओ' असा ऑप्शन देण्यात आला आहे. अद्याप हा ऑप्शन चालू करण्यात आला नाही आहे.
सध्या या फेसबुक अॅपवर काम सुरु असून त्यांची अमंलबजावणी झाल्यास प्रोफाईल व्हिडीओ हा सात सेकंदाच असणार आहे, तसेच याठिकाणी युजर्सला जीआयएफ इमेल सुद्धा अपलोड करता येणार आहे. ज्यावेळी एखाद्या युजर्सच्या फेसबुक पेजवर भेट दिल्यास, त्या पेजवर अपलोड करण्यात आलेला प्रोफाईल व्हिडीओ प्ले होणार आहे.