मुंबई: जगभरात कोरोनानं थैमान घातलंय. जगभरातल्या कोट्यवधी लोकांना कोरोनाचा फटका बसलाय. या पार्श्वभूमीवर फेसबुकनं आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केलीय. कोरोनाचा सामना करण्यासाठी फेसबुक कर्मचाऱ्यांना १ हजार डॉलर्सचा बोनस देणार आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केलीय. फेसबुकमध्ये ४५ हजार कर्मचारी काम करतात. या प्रत्येक कर्मचाऱ्याला फेसबुक एप्रिलमध्ये १ हजार डॉलर्सचा बोनस देणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांचा अर्धवाषिक आढावा घेताना सर्वांना इक्सिड रेटिंग देण्यात येईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत फेसबुककडून कर्मचाऱ्यांना आणखी मोठा बोनस दिला जाऊ शकतो. कोरोनामुळे कार्यालयात येऊ न शकणाऱ्या, कोरोनाची बाधा झालेल्या कर्मचाऱ्यांनादेखील कंपनी बोनस देणार आहे. याशिवाय कंपनीनं सिएटल आणि बे एरियातल्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सीएनएन बिझनेसनं दिलेल्या वृत्तानुसार फेसबुकच्या पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांनाच बोनसचा लाभ मिळेल. फेसबुकसोबत कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्यांना मात्र बोनस मिळणार नाही. फेसबुक लहान व्यवसायांमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. फेसबुककडून लहान व्यवसायांमध्ये तब्बल १०० मिलियन डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे. याशिवाय फेसबुक लहान कंपन्यांना व्याजानं काही रक्कमदेखील देणार आहे.
Coronavirus: कंपनी असावी तर अशी; प्रत्येक कर्मचाऱ्याला देणार १ हजार डॉलर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 15:55 IST
Coronavirus कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कंपनीकडून बोनस जाहीर; ४५ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
Coronavirus: कंपनी असावी तर अशी; प्रत्येक कर्मचाऱ्याला देणार १ हजार डॉलर्स
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक कर्मचाऱ्यांना देणार बोनसकोरोनाचा सामना करण्यासाठी आर्थिक मदततब्बल ४५ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस