शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

FaceAppची जगभरात धास्ती; अमेरिकेच्या खासदारांनाही वाटतेय भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 4:52 PM

फेसअ‍ॅपच्या माध्यमातून मोबाईलमधील माहितीची चोरी होत असल्याचा आरोप

वॉशिंग्टन- जगभरातील अनेकांना सध्या फेसअ‍ॅपनं भुरळ घातली आहे. मात्र या अ‍ॅपमुळे माहितीची चोरी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच या अ‍ॅपचा तपास केला जावा, अशी मागणी अमेरिकेच्या एका वरिष्ठ खासदारानं सिनेटमध्ये केली. फेसअ‍ॅप प्रकरणाचा तपास एफबीआयनं करावा, या मागणीसाठी संबंधित खासदारानं संस्थेच्या प्रमुखांना पत्रदेखील लिहिलं. फेसअ‍ॅपच्या माध्यमातून रशिया माहिती गोळा करत असल्याचा संशय खासदारानं व्यक्त केला. अमेरिकन सिनेटचे सदस्य असलेल्या चक श्युमर यांनी एफबीआयचे संचालक ख्रिस्तोफर रे यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी फेसअ‍ॅपबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून वापरकर्त्याची माहिती चोरली जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. फेसअ‍ॅपचं मुख्यालय सेंट पीटर्सबर्गमध्ये असल्याचं त्यांनी एफबीआयच्या निदर्शनास आणून दिलं. यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि कोट्यवधी अमेरिकन नागरिकांची माहिती धोक्यात असल्याचं श्युमर यांनी पत्रात नमूद केलं आहे. 

त्याआधी काल डेमोक्रेटिक नॅशनल कमिटीचे प्रमुख बॉब लॉर्ड यांनी फेसअ‍ॅप डिलीट करण्याचं आवाहन केलं. अमेरिकेत २०१६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत डेमोक्रेटिक नॅशनल कमिटीला रशियन हॅकर्सचा फटका बसला होता. फेसअ‍ॅपची निर्मिती २०१७ मध्ये रशियन कंपनी वायरलेस लॅबनं केली. गेल्या काही दिवसांमध्ये या अ‍ॅपद्वारे तयार करण्यात आलेले फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अनेक चित्रपट कलाकारांनी, खेळाडूंनी या अ‍ॅपच्या माध्यमातून एडिट करण्यात आलेले फोटो शेअर केले आहेत. 

काय आहे फेस अ‍ॅप?फेसअ‍ॅप हे आर्टिफिशियल (AI) इंटेलिजन्स अल्गोरिदमवर काम करतं. एआयच्या मदतीने युजर्सचा चेहरा कसा दिसेल हे सांगितलं जातं. ओल्ड फेस फिल्टर वापरल्यावर चेहऱ्यावर सुरकुत्या दाखवल्या जातात. म्हातारपणी लोक कसे दिसतील हे दाखवण्यासाठी न्यूरल नेटवर्कचा वापर केला जातो. ज्यामुळे युजर्सची प्रायव्हसी ही धोक्यात येऊ शकते. 

टॅग्स :Face App Challengeफेसअ‍ॅप चॅलेंजAmericaअमेरिकाrussiaरशिया