पश्चिम बंगालमध्ये स्फोटके जप्त

By Admin | Updated: June 19, 2014 04:24 IST2014-06-19T04:24:18+5:302014-06-19T04:24:18+5:30

येथील पोलिसांनी ५०० डिटोनेटर्स व ६०० जिलेटिनच्या छड्यांसह अन्य स्फोटके जप्त करून दोघा जणांना ताब्यात घेतले आहे.

Explosives were seized in West Bengal | पश्चिम बंगालमध्ये स्फोटके जप्त

पश्चिम बंगालमध्ये स्फोटके जप्त

पुरुलिया : येथील पोलिसांनी ५०० डिटोनेटर्स व ६०० जिलेटिनच्या छड्यांसह अन्य स्फोटके जप्त करून दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. हे दोघे कारमधून ही स्फोटके नेत होते.
पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. तेउलग्राम येथे ही कार अडवून तिची झडती घेण्यात आली. तेव्हा हा साठा सापडल्याचे पोलीस अधीक्षक नीलकांता कुमार यांनी सांगितले.
कारचालक सुबल मोहातो आणि जालाधर द्वारी या दोघांची चौकशी सुरू आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Explosives were seized in West Bengal