ऑनलाइन लोकमततेहरान, दि. 4 - उत्तर इरानमधील गोलेस्टन प्रांतामधील एका कोळसा खाणीत झालेल्या प्रचंड स्फोटात किमान दोन जण ठार झाले असून, तब्बल ८0 जण आत अडकले आहेत. भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री १0 वाजता हाती आलेल्या वृत्तानुसार कामगारांची पाळी बदलत असताना हा स्फोट झाला. माहिती मिळताच हेलीकॉफ्टर, अॅम्ब्युलंस व बचाव वाहने घटनास्थळी पोहोचली. आत अडकलेल्या कामगारांना वाचविण्यास खाणीत गेलेले बचाव पथकाचे २५ सदस्य गुदमरल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. आतमध्ये जास्तीत जास्त ८0 कामगार अडकलेले असावेत, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
कोळसा खाणीत प्रचंड स्फोट; दोन ठार, २५ दवाखान्यात
By admin | Updated: May 4, 2017 02:06 IST