सोमालियात स्फोट
By Admin | Updated: August 31, 2014 23:22 IST2014-08-31T23:22:09+5:302014-08-31T23:22:09+5:30
सोमालियाच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर संशयित अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट आणि गोळीबार करीत हल्ला चढविला

सोमालियात स्फोट
मोगादिशू : सोमालियाच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर संशयित अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट आणि गोळीबार करीत हल्ला चढविला. अशा प्रकारचे हल्ले ‘अल कायदा’शी संलग्नित इस्लामिक शबाब ही संघटना करते.
कारबॉम्बचा स्फोट करण्यात आल्याचे सांगण्यात येते. सुरक्षा दलानेही प्रतिकारादाखल गोळीबार केला. तथापि, या धुमश्चक्रीत जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.