व्हाईट हाऊसजवळ धमाका

By Admin | Updated: March 8, 2015 02:56 IST2015-03-08T02:56:47+5:302015-03-08T02:56:47+5:30

जबरदस्त आवाजाने व्हाईट हाऊस हादरले. साऊथ लॉनच्या बाजुने हा धमाकेदार आवाज ऐकू येताच तेथील सुरक्षा विभागाने या संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करून तपासाची चक्रे फिरविली.

Explosion near the White House | व्हाईट हाऊसजवळ धमाका

व्हाईट हाऊसजवळ धमाका

वॉशिंग्टन : जबरदस्त आवाजाने व्हाईट हाऊस हादरले. साऊथ लॉनच्या बाजुने हा धमाकेदार आवाज ऐकू येताच तेथील सुरक्षा विभागाने या संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करून तपासाची चक्रे फिरविली. अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांचे कुटुंबियांसोबत हेलिकॉप्टर व्हाईट हाऊस परिसरातील तळावरून उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाचा हा जोरदार धमाका झाला. गुप्तचर सेवा अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करीत पत्रकार कक्षाकडे धाव घेत त्यात सर्व पत्रकारांना आतच ठेऊन कुलुप घातले. सुदैवाने ओबामा आणि त्यांचे कुटुंब साऊथ लॉनमध्ये नव्हते. ते हेलिकॉप्टरने अ‍ॅण्ड्र्यूज एअर फोर्स तळाकडे जाणार होते.

Web Title: Explosion near the White House