फ्रान्सच्या अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट
By Admin | Updated: February 9, 2017 16:48 IST2017-02-09T16:48:48+5:302017-02-09T16:48:48+5:30
फ्रान्सच्या एका अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट झाला असून या स्फोटात काही जण जखमी झाल्याचे समजते.

फ्रान्सच्या अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट
>ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 09 - फ्रान्सच्या एका अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट झाला असून या स्फोटात काही जण जखमी झाल्याचे समजते.
येथील स्थानिक दैनिकांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या ईडीएफ फ्लेमनविले अणुऊर्जा प्रकल्पात गुरुवारी स्फोट झाला असून या स्फोटात काही जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या स्फोटामुळे अणुऊर्जा प्रकल्पाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे समजते. घटनास्थळी स्थानिक पोलीस दाखल झाले आहेत.
दरम्यान, या स्फोटाबाबत ईडीएफ फ्लेमनविलेच्या पॅरिसमधील मुख्य कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.