अफगाणिस्तानात जलालाबादमध्ये दूतावासांच्या इमारतींजवळ स्फोट
By Admin | Updated: January 5, 2016 14:03 IST2016-01-05T13:58:07+5:302016-01-05T14:03:13+5:30
अफगाणिस्तानातील जलालाबाद शहरात परदेशी दूतावासांच्या इमारती असलेल्या भागामध्ये मंगळवारी सकाळी बॉम्बस्फोट झाला.

अफगाणिस्तानात जलालाबादमध्ये दूतावासांच्या इमारतींजवळ स्फोट
ऑनलाइन लोकमत
जलालाबाद, दि. ५ - अफगाणिस्तानातील जलालाबाद शहरात परदेशी दूतावासांच्या इमारती असलेल्या भागामध्ये मंगळवारी सकाळी बॉम्बस्फोट झाला. भारत, पाकिस्तान आणि इराणच्या दूतावासापासून काही मीटर अंतरावर बॉम्बस्फोट झाला अशी माहिती अफगाणी प्रवक्त्याने दिली. या बॉम्बस्फोट वित्तहानी झाली असली तरी, जिवीतहानी झाली नसल्याचे समजते.
उत्तर अफगाणिस्तानातील मझर-ए-शरीफ शहरातील भारतीय दूतावासावर रविवारी दहशतवादी हल्ला झाला होता. पंजाबमधील पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानी अतिरेकी आणि सुरक्षाजवानांमध्ये चकमक सुरु असतानाच अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासावर हल्ला करण्यात आला.
जलालाबादमधील बॉम्बस्फोटाचे नेमके लक्ष्य कोणे होते ते अद्याप स्पष्ट झालेले नाही तसेच अजूनपर्यंत कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.