पाकिस्तानात चौघा अतिरेक्यांना फाशी

By Admin | Updated: December 29, 2015 15:15 IST2015-12-29T15:15:15+5:302015-12-29T15:15:15+5:30

निर्दोष नागरीकांची हत्या आणि सैनिकांवर हल्ला अशा गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी ठरलेल्या चौघा दहशतवाद्यांना मंगळवारी पाकिस्तानात फासावर लटकवण्यात आले.

The execution of four terrorists in Pakistan | पाकिस्तानात चौघा अतिरेक्यांना फाशी

पाकिस्तानात चौघा अतिरेक्यांना फाशी

>ऑनलाइन लोकमत 
इस्लामाबाद, दि. २९ - आत्मघातकी बॉम्ब हल्ला, निर्दोष नागरीकांची हत्या आणि सैनिकांवर हल्ला अशा गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी ठरलेल्या चौघा दहशतवाद्यांना मंगळवारी पाकिस्तानात फासावर लटकवण्यात आले. 
याच महिन्यात तीन डिसेंबरला लष्करी शाळेवरील हल्ला प्रकरणात दोषी ठरलेल्या चौघा दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या सेंट्रल तुरुंगात फासावर लटकवण्यात आले होते. 
कोहट येथील सेंट्रल जेलमध्ये मंगळवारी सकाळी चौघांना फासावर लटकवण्यात आले अशी माहिती कोहटचे जिल्हा पोलिस अधिकारी झोहेब अश्रफ यांनी दिली. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. 
 

Web Title: The execution of four terrorists in Pakistan