पाकिस्तानात चौघा अतिरेक्यांना फाशी
By Admin | Updated: December 2, 2015 15:51 IST2015-12-02T15:51:23+5:302015-12-02T15:51:23+5:30
मागच्यावर्षी पेशावरमध्ये लष्करी शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असणा-या चौघा दोषींना बुधवारी पाकिस्तानात फासावर लटकवण्यात आले.

पाकिस्तानात चौघा अतिरेक्यांना फाशी
ऑनलाईन लोकमत
पेशावर, दि. २ - मागच्यावर्षी पेशावरमध्ये लष्करी शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असणा-या चौघा दोषींना बुधवारी पाकिस्तानात फासावर लटकवण्यात आले.
या भीषण दहशतवादी हल्ल्यात १३४ निष्पाप मुलांचा मृत्यू झाला होता. पेशावरच्या मध्यवर्ती कारागृहात बुधवारी सकाळी या चौघा दोषींना फासावर लटकवण्यात आले. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती.
हजरत अली, मुजीब उर रेहमान, साबील आणि अब्दुस सलाम या चौघांना १३ ऑगस्टला दोषी ठरवण्यात आले होते. पाकिस्तान तालिबानशी संबंधित असलेल्या तोहीदवाल जिहाद गटाचे ते सदस्य होते.
या कटात सहभागी असलेल्या आणखी तिघांनाही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र त्यांना अद्याप फाशी देण्यात आलेली नाही.
मागच्यावर्षी १६ डिसेंबरला नऊ दहशतवाद्यांनी पेशावरमधल्या लष्करी शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार केला होता. एकूण १५१ जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता. यात १३४ निष्पाप शाळकरी मुले होती.