शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

"बस जळून खाक झाली, पण ड्रायव्हर वाचला"; सौदीतल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितला सांगितला थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 14:34 IST

सौदीत झालेल्या भीषण बस अपघातात ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू झाला.

Saudi Arabia Bus Accident: सौदी अरेबियात एक भीषण रस्ता अपघात झाला असून ज्यामध्ये ४२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. मक्काहून मदीनाला जाणाऱ्या अनेक भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसची डिझेल टँकरशी टक्कर झाली, ज्यामुळे बसला आग लागली. सौदी अरेबियाच्या मुफ्रीहाट भागात हा अपघात झाला. मृतांपैकी अनेक जण तेलंगणाचे होते. या भीषण दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी पोहोचली मात्र बसचा संपूर्ण कोळसा झाला होता. या अपघातात फक्त एकाच व्यक्तीचा जीव वाचला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मक्का येथून मदिनाकडे उमराह यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंनी भरलेल्या बसचा भीषण अपघात झाला. सौदी अरेबियामध्ये रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका डिझेल टँकरची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला आहे. ही धडक इतकी जबरदस्त होती की, बसने क्षणात पेट घेतला आणि बघता बघता संपूर्ण बस जळून खाक झाली. या अत्यंत भयंकर अपघातात बसमधील तब्बल ४२ भारतीय यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बसचा चालक मोहम्मद अब्दुल शोएब हा मात्र चमत्कारिकरित्या बचावला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हैदराबादच्या यात्रेकरूंचा मोठा सहभाग

या अपघातातील बसमध्ये प्रवास करणारे बहुतांश यात्रेकरू हे भारतीय होते. यापैकी बहुतांश यात्रेकरू हे हैदराबाद येथील 'अल-मिना हज आणि उमराह ट्रॅव्हल्स' या एजन्सीमार्फत प्रवास करत होते आणि किमान १६ प्रवासी एकट्या हैदराबाद शहरातून होते. अपघाताच्या ठिकाणाहून एका व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे. हा हैदराबादचा नागरिक असलेला प्रत्यक्षदर्शी फोनवर बोलताना सांगत आहे. "मक्काहून मदिनाकडे येणारी ती बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. त्या बसमधून केवळ चालक आणि एक व्यक्ती वाचली आहे. बसमध्ये हैदराबादचे अनेक लोक होते," असं तो व्हिडीओमध्ये म्हणत आहे. त्याने लोकांना त्यांच्या नातेवाइकांचा ठावठिकाणा  शोधण्याचे आवाहन केले आहे.

भारताकडून तातडीने मदतकार्य

या भीषण दुर्घटनेनंतर भारत सरकारने आणि परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने पाऊले उचलली आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. रियाध आणि जेद्दाह येथील भारतीय दूतावासातील अधिकारी पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करत आहेत. तेलंगणा सरकारने दिल्लीतील तेलंगणा भवन येथे तात्काळ एक नियंत्रण कक्ष सुरु केला आहे. तसेच, जेद्दाह येथील भारतीय दूतावासाने मदतीसाठी २४x७ हेल्पलाइन क्रमांक ८००२४४०००३ जारी केला आहे. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Saudi Bus Fire Kills 42 Indians; Driver Survives Miracle

Web Summary : A horrific bus accident in Saudi Arabia killed 42 Indian pilgrims en route from Mecca to Medina. A diesel tanker collision caused a fire, leaving only the driver and one passenger alive. Indian authorities are providing assistance.
टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाAccidentअपघात