पत्नीबरोबर सेक्स करणं हा पतीचा मूलभूत अधिकार, न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 03:53 PM2019-04-04T15:53:28+5:302019-04-04T15:57:01+5:30

लंडनमधील एका न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे

English judge says man having sex with wife is 'fundamental human right' | पत्नीबरोबर सेक्स करणं हा पतीचा मूलभूत अधिकार, न्यायालयाचा निर्णय

पत्नीबरोबर सेक्स करणं हा पतीचा मूलभूत अधिकार, न्यायालयाचा निर्णय

googlenewsNext

लंडनः लंडनमधील एका न्यायालयानं एक वेगळाच निर्णय दिला आहे. कोणताही पती आपल्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवू शकतो, हा त्याचा मूलभूत अधिकार आहे, असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. इंग्लंड आणि वेल्स उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एपी हेडन यांनी हा निर्णय सुनावला आहे. न्यायाधीश हेडननं कोर्ट ऑफ प्रोटेक्शनच्या एका प्रकरणात हा निर्णय दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका पत्नीनं पतीबरोबर सेक्स करण्यास नकार दिला होता. त्यानंतर पतीनं न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

कनिष्ठ न्यायालयानं पत्नीच्या बाजूनं निर्णय देऊन 20 वर्षं संबंध प्रस्थापित करण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर पतीनं उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. उच्च न्यायालयानं पतीच्या बाजूनं निर्णय दिला. पतीला आपल्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार आहे. तसेच कोणीही या पतीच्या मूलभूत अधिकारावर बंदी आणू शकत नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर लेबर पार्टीनंही संसदेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत.

लेबर पार्टीचे खासदार म्हणाले, ब्रिटनमध्ये कोणत्याही व्यक्तीला जोरजबरदस्तीनं सेक्स करण्याचा अधिकार नाही. अशातच एखाद्या पतीनं पत्नीच्या विरोधात जाऊन सेक्स केल्यास तो बलात्कार समजला जातो. तसेच एका महिलेनं ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, सेक्स हा काही मानवाधिकार नाही. न्यायालयाच्या निर्णयावर अनेकांनी असहमती दर्शवली आहे. पत्नीच्या इच्छेविरोधात जाऊन संबंधित प्रस्थापित करण्याचा कोणत्याही पतीला अधिकार नसल्याचंही अनेकांनी मत व्यक्त केलं आहे. 

Web Title: English judge says man having sex with wife is 'fundamental human right'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.