इंग्लडचे पंतप्रधानपद थेरेसा मे यांना मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 22:04 IST2016-07-11T22:04:53+5:302016-07-11T22:04:53+5:30
इंग्लडच्या पंतप्रधानपदाची सूत्रे गृहमंत्री थेरेसा मे बहुधा बुधवारी स्वीकारतील, असे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी सोमवारी सांगितले.

इंग्लडचे पंतप्रधानपद थेरेसा मे यांना मिळणार
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ११ - इंग्लडच्या पंतप्रधानपदाची सूत्रे गृहमंत्री थेरेसा मे बहुधा बुधवारी स्वीकारतील, असे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी सोमवारी सांगितले.
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मे यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या अँन्ड्रिया लिडसोम यांनी अनपेक्षितपणे माघार घेतल्यामुळे थेरेसा मे यांना कोणीही प्रतिस्पर्धी उरला नाही.
कॅमेरून मंगळवारी मंत्रिमंडळाची शेवटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील आणि बुधवारी ते राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्याकडे अधिकृतरित्या राजीनामा सादर करतील.