शार्कच्या हल्ल्यात महिलेचा अंत
By Admin | Updated: February 15, 2015 23:45 IST2015-02-15T23:45:55+5:302015-02-15T23:45:55+5:30
हिंदी महासागराच्या फ्रान्समधील बेटाजवळ पोहणाऱ्या एका महिलेवर शार्क माशाने हल्ला केला असून, या हल्ल्यात ही २० वर्षांची महिला मृत्युमुखी पडली आहे

शार्कच्या हल्ल्यात महिलेचा अंत
लेतांग सेल : हिंदी महासागराच्या फ्रान्समधील बेटाजवळ पोहणाऱ्या एका महिलेवर शार्क माशाने हल्ला केला असून, या हल्ल्यात ही २० वर्षांची महिला मृत्युमुखी पडली आहे. या महिलेच्या पायाला शार्क माशाने चावे घेतले होते. इटांग सेल बेटावर किनारपट्टीजवळ ही महिला पोहत होती. तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)