शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

मोबाइलमधून ‘इर्मजन्सी जासुसी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 4:28 PM

आपण आत्ता कुठे आहोत, काय करतोय आणि आगदी आपण काय बोलतोय, याचीही इत्यंभूत माहिती आपल्या मोबाइलच्या माध्यमातून जगजाहीर होत असताना याच मोबाइलचा वापर आता कोरोना रोखण्यासाठी केला जाणार आहे. 

ठळक मुद्देही ‘इर्मजन्सी जासुसी’ खरंच कोरोनाला अटकाव करेल की आणखी काही, ते लवकरच कळेल.

लोकमत-

 

 

आपण आत्ता कुठे आहोत, काय करतोय आणि आगदी आपण काय बोलतोय, याचीही इत्यंभूत माहिती आपल्या मोबाइलच्या माध्यमातून जगजाहीर होत असताना याच मोबाइलचा वापर आता कोरोना रोखण्यासाठी केला जाणार आहे. मोबाइल लोकेशनचा वापर करून त्या माहितीचा वापर कोरोना रोखण्यासाठी कसा करता येईल याचे जागतिक पातळीवर प्रय} सुरू झाले आहेत.इस्त्रायलनं तर यापुढे जाऊन तसा कायदाही केला आहे. मोबाइलच्या लोकेशनवरून आपण कुठे आहोत, हे मोबाइल कंपन्यांना कळेल. ही माहिती ते आरोग्य कर्मचार्‍यांना देतील. एखादी व्यक्ती कोरोनाबाधित किंवा संशयित असेल, तर आपोआपच तिच्या हालचाली कळतील. ती व्यक्ती कुठे गेली होती, कोणाच्या संपर्कात आली होती हे कळेल. त्या व्यक्तीवर नजर तर ठेवता येईलच, पण तिच्या संपर्कातील लोकांनाही लगेच सावध केलं जाईल. सगळ्यांना मेसेजेस पाठवले जातील. इतकंच नव्हे, ती व्यक्ती नियमांचं पालन करते आहे, की नाही, यावरही ‘पाळत’ ठेवली जाईल! आताच्या बिकट, आणिबाणीच्या परिस्थितीत हा पर्याय अत्यावश्यक असल्याचं इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचं म्हणणं आहे, तर संशयितांना शोधून काढण्यासाठी आणि कोरोनाबाधितांवर नजर ठेवण्यासाठी चीननं याच मार्गाचा उपयोग केल्याचं म्हटलं जातंय. चीनमधील ‘वी चॅट’ हे मेसेजिंग अँप तयार करणार्‍या कंपनीनं क्यूआर कोडवर आधारित एक ट्रॅकिंग फिचरही तयार केलं आहे. एखादी व्यक्ती कोरोनाबाधिताच्या संपर्कात आली, तर लगेच हे अँप त्याला सांगतं, ‘तुला आता उपचारांची आणि क्वॉरण्टाइन होण्याची गरज आहे. ही ‘इर्मजन्सी जासुसी’ खरंच कोरोनाला अटकाव करेल की आणखी काही, ते लवकरच कळेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या