लाजिरवाणे! सगळे भिकारी विमानाने सौदी, युएईला चालले; कंगाल पाकिस्तानवर देश भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 06:54 PM2023-09-27T18:54:33+5:302023-09-27T18:55:23+5:30

पाकिस्तानचे नाव विचित्र कारणासाठी जगभर गाजतेय... भिकारी इम्पोर्ट करणारा देश...

Embarrassing! All the beggars went by plane to Saudi, UAE; Pakistan became worlds beggers importer country | लाजिरवाणे! सगळे भिकारी विमानाने सौदी, युएईला चालले; कंगाल पाकिस्तानवर देश भडकले

लाजिरवाणे! सगळे भिकारी विमानाने सौदी, युएईला चालले; कंगाल पाकिस्तानवर देश भडकले

googlenewsNext

भिकेला लागला तरी दहशतवाद्यांना पोसायचे काही सोडत नसलेला पाकिस्तान आता जगातील सर्वात मोठा भिकाऱ्यांचा निर्यातक देश बनला आहे. यामुळे पाकिस्तानने फारसे दिवे लावलेले नसले तरी जगभरात पुन्हा चर्चेत आला आहे. परदेशांत जेवढ्या भिकाऱ्यांना अटक केली जाते, त्यापैकी ९० टक्के भिकारी हे पाकिस्तानी असतात एवढी या देशाची ख्याती पसरलेली आहे. यामुळे सौदी अरेबिया, युएई, इराण सारखे देश त्रस्त झाले आहेत. 

इराण आणि सौदीच्या तुरुंगांत मोठ्या संख्येने पाकिस्तानचे भिकारी डांबले गेले आहेत. या देशांची तुरुंगे पाकिस्तानी भिकाऱ्यांनी भरू लागली आहेत. रदेशात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी नागरिक भीक मागण्यात गुंतलेले आहेत, त्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागत आहे, असे पाकिस्तान सरकारच्या सिनेट स्थायी समितीमध्ये सांगण्यात आले आहे. 

पाकिस्तानी मंत्रालयाचे सचिव झीशान खानजादा यांनी स्थायी समितीला माहिती देताना सांगितले की, पाकिस्तानचे सुमारे 10 लाख नागरिक परदेशात आहेत. त्यापैकी मोठी संख्या भीक मागण्यात गुंतलेली आहे. पाकिस्तानचे हे लोक व्हिसा घेऊन इतर देशांत भीक मागू लागतात. पाकिस्तानातून निघालेली जहाजे, विमाने पूर्णपणे भिकाऱ्यांनी भरलेली असतात. 

परदेशात अटक करण्यात आलेल्या भिकार्‍यांपैकी 90 टक्के पाकिस्तानी वंशाचे आहेत. आपल्या देशांची तुरुंगे पाकिस्तानी भिकाऱ्यांनी भरलेली असल्याचे इराक आणि सौदी अरेबियाच्या राजदूतांनीही म्हटले आहे. सौदी अरेबियात पकडण्यात आलेले अनेक पाकिटमार हे पाकिस्तानी आहेत. हे लोक उमराह व्हिसावर भीक मागण्यासाठी सौदी अरेबियात जातात, असेही सांगण्यात आले आहे. 
 

Web Title: Embarrassing! All the beggars went by plane to Saudi, UAE; Pakistan became worlds beggers importer country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.