शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

CoronaVirus: ‘डब्ल्यूएचओ’सह अनेक संस्थांचे ई-मेल, पासवर्ड, कागदपत्रे हॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 07:08 IST

गेट्स फाउंडेशनलाही फटका; महत्त्वाची माहिती सोशल मीडियावर उघड

वॉशिंग्टन : ‘कोविड-१९’च्या साथीशी मुकाबला करत असलेली जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, गेट्स फाउंडेशन तसेच इतर काही संस्थांच्या वेबसाइटमधील माहिती हॅक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे या संस्थांचे हजारो ई-मेल, पासवर्ड तसेच कागदपत्रे यातील महत्त्वाची माहिती उघड झाल्याने खळबळ माजली आहे.इंटरनेट माध्यमात हॅकिंग करणाऱ्यांवर बारीक नजर ठेवणाºया साइट इंटेलिजन्स ग्रुपने याबाबत म्हटले आहे, की या रोगाविरोधातील लढ्यात विविध संघटनांनी पाठविलेले सुमारे २५ हजार ई-मेल तसेच पासवर्ड हॅक करण्यात आले आहेत. या ई-मेल, पासवर्ड तसेच कागदपत्रांचे स्क्रीन शॉट टिष्ट्वटरवर झळकविण्यात आले आहेत. हेही हॅकरचेच काम आहे. हे हॅकिंग रविवारी व सोमवारी करण्यात आले आहे.‘साइट’ या संस्थेने म्हटले आहे, की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (एनआयएच) ही संस्था या हॅकिंगची सर्वांत मोठी बळी ठरली आहे. एनआयएचचे सुमारे ९,९३८ ई-मेल व पासवर्ड चोरून ती माहिती हॅकरनी सोशल मीडियात झळकवली आहे. त्याशिवाय सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेचे ६,८५७, जागतिक बँकेचे ५,२१०, जागतिक आरोग्य संघटनेचे २,७३२ ई-मेल व पासवर्ड हॅक करण्यात आले आहेत. हे सारे ई-मेल व इतर तपशील सोशल मीडियावर उघड करण्यात आला आहे.वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये कोरोनाच्या विषाणूची निर्मिती करण्यात आली, असा आरोप काही देशांतील तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे चर्चेत असलेली ही संस्था तसेच मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांची गेट्स फाउंडेशन या संस्थेची कागदपत्रे व अन्य माहिती हॅक करण्यात आली आहे. त्यातील काही माहिती सोशल मीडियावर उघड होण्याचा प्रकारच या संस्थांची झोप उडविणारा आहे. (वृत्तसंस्था)नवनाझींचे कृत्य असल्याचा कयासहॅकरनी विविध संस्थांचे हॅक केलेले ई-मेल व त्यांचे पासवर्ड हे खरे आहेत की नाही, याची पडताळणी साईट या हॅकरच्या कारवायांवर लक्ष ठेवणाºया संस्थेने अद्याप केलेली नाही.साईटच्या कार्यकारी संचालक रिटा काट्झ यांनी सांगितले, की नवनाझी तसेच गौरवर्णाचा अतिरेकी अभिमान असलेल्या लोकांनी हे हॅकिंगचे कृत्य केले असावे, पण त्याबद्दल निश्चित पुरावा अद्याप मिळालेला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना