शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

बाप रे बाप! एलन मस्कच्या वडिलांचे सावत्र मुलीशी संबंध; दोन सीक्रेट मुले, खुलाशाने जग हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 14:52 IST

न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार एरोल मस्क यांनी एका ब्रिटिश टॅब्लॉईडला ही मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी जानासोबतच्या संबंधांवर प्रकाश टाकला आहे. 

जगविख्यात अब्जाधीश एलन मस्क यांच्याबाबत नेहमीच वेगवेगळे धक्कादायक खुलासे होत असतात. काही दिवसांपूर्वी मस्क यांना त्यांच्याच कंपनीतील महिला अधिकाऱ्यापासून दोन जुळी मुले झाल्याचे समोर आले होते. अशा प्रकारे एलन मस्क हे ९ मुलांचे पिता बनले आहेत. असे असताना मस्क यांच्या वडिलांनी त्याहून धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

एरोल मस्क हे ७६ वर्षांचे आहेत. त्यांनी ३५ वर्षीय सावत्र मुलीशी शारीरीक संबंध असल्याचा खुलासा केला आहे. एवढेच नाही तर तिच्यापासून त्यांना दोन सिक्रेट मुलेदेखील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जाना बेजुइडेनहाउटने तीन वर्षांपूर्वी त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिल्याचे त्यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे. 

न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार एरोल मस्क यांनी एका ब्रिटिश टॅब्लॉईडला ही मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी जानासोबतच्या संबंधांवर प्रकाश टाकला आहे. मुले जन्माला घालण्यासाठीच आपण पृथ्वीवर आहोत, असे ते म्हणाले. मस्क यांच्यानुसार जानाने त्यांच्या पहिल्या अपत्याला २०१७ मध्ये जन्म दिला होता. त्याचे नाव इलियट रश आहे. 

जाना ही एरोल यांची दुसरी पत्नी हाइड बेजुइडेनहाउट हिची मुलगी आहे. १९७९ मध्ये एलन मस्क यांची आई मेय हल्दमैन मस्क हिचाशी वेगळे झाल्यावर त्यांनी दुसरे लग्न केले होते. तिच्या आधीच्या पतीपासूनची जाना ही मुलगी आहे. ती तेव्हा ४ वर्षांची होती. एरोल आणि हाइड यांनी १८ वर्षांनी घटस्फोट घेतला. 

एलन मस्क यांना जेव्हा जाना प्रेग्नंट असल्याचे समजले होते, तेव्हा त्यांना धक्का बसला होता. एलन आणि एरोल यांच्यात तीव्र मतभेदही झाले होते. यामुळे एलन मला पसंद करत नाही, असे एरोल यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. हाईडपासून एरोल यांना दोन मुले आहेत. जानाला देखील एरोल यांनीच सांभाळले होते. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्क