शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 13:49 IST

Elon Musk To Trump: इलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा उघडपणे विरोध केला आहे.

Elon Musk Criticised Trump: उद्योगपती इलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर उघडपणे टीका केली आहे. ट्रम्प प्रशासनाने आणलेला नवीन कर आणि खर्च विधेयक अमेरिकेसाठी वेडेपणाचा आणि विनाशकारी असल्याचे मस्क यांचे म्हणने आहे. या विधेयकामुळे अमेरिकेचे गंभीर नुकसान होईल आणि लाखो नोकऱ्या जातील, असा दावाही त्यांनी केला आहे. 

एकेकाळी ट्रम्प यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक असलेले मस्क आता उघडपणे ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका करताना दिसतात. ट्रम्प प्रशासनाने आणलेल्या या नवीन विधेयकात अशा अनेक तरतुदी आहेत, ज्यांचा अमेरिकेच्या सध्याच्या सामाजिक आणि आर्थिक रचनेवर खोलवर परिणाम होऊ शकतो. मेडिकेड आणि फूड स्टॅम्प सारख्या सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च कपात, अमेरिका-मेक्सिको सीमा भिंत वाढवण्यासाठी $46 अब्ज, 1 लाख स्थलांतरित बंदीसाठी $45 अब्ज, 10,000 नवीन ICE अधिकाऱ्यांची भरती, ज्यांच्यासाठी $10,000 चा बोनस, $350 अब्ज सीमा आणि राष्ट्रीय सुरक्षा योजनेचा एक भाग इत्यादींचा यात समावेश आहे. यावरुन मस्क सातत्याने टीका करत आहेत.

भविष्यातील उद्योगांसाठी धोका - मस्कचा इशाराइलॉन मस्क यांचा असा दावा आहे की, हे विधेयक अमेरिकेच्या भविष्यातील तंत्रज्ञान आणि उद्योगांसाठी घातक ठरू शकते. हे विधेयक भविष्यातील उद्योगांना हानी पोहोचवून जुन्या उद्योगांना सवलती देते. याद्वारे त्यांनी सूचित केले की, हे विधेयक तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या वेगाने वाढणाऱ्या उद्योगांच्या विकासात अडथळा ठरू शकते.

४ जुलैपर्यंत हे विधेयक मंजूर करण्याचे आदेश राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन खासदारांना ४ जुलैपूर्वी सिनेट आणि सभागृहात हे विधेयक मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही सभागृहांमध्ये रिपब्लिकन पक्षांला बहुमत असल्याने, विधेयक मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी या विधेयकाचे वर्णन त्यांच्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणाचा एक भाग म्हणून केले आहे, ज्यामध्ये देशाच्या सीमा मजबूत करणे, बेकायदेशीर स्थलांतरितांना हटवणे आणि सुरक्षेवर खर्च वाढवणे ही मुख्य उद्दिष्टे आहेत.

दरवर्षी १० लाख स्थलांतरितांना हद्दपार करण्याची योजनाया विधेयकाचा सर्वात वादग्रस्त पैलू म्हणजे, ट्रम्प यांनी दरवर्षी १० लाख स्थलांतरितांना अमेरिकेतून हाकलून लावण्याचा मुद्दा मांडला आहे. अमेरिकन इतिहासातील ही सर्वात मोठी हद्दपारी मोहीम असेल. तथापि, या योजनेवर टीकाही होत आहे. मस्कप्रमाणेच अनेक उद्योगपती, मानवाधिकार कार्यकर्ते आणि काही रिपब्लिकन खासदारांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका