भारीच! आता डिग्रीशिवाय मिळणार Tesla मध्ये नोकरीची संधी; एलन मस्क यांची 10,000 लोकांना रोजगार देण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 04:17 PM2021-04-05T16:17:32+5:302021-04-05T16:28:26+5:30

Elon Musk Tesla 10 Thousand Jobs : टेस्ला मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 2022 पर्यंत 10000 हून अधिक लोकांना काम देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. 

elon musk promises to give 10 thousand jobs in tesla college degree will not be required for job | भारीच! आता डिग्रीशिवाय मिळणार Tesla मध्ये नोकरीची संधी; एलन मस्क यांची 10,000 लोकांना रोजगार देण्याची घोषणा

भारीच! आता डिग्रीशिवाय मिळणार Tesla मध्ये नोकरीची संधी; एलन मस्क यांची 10,000 लोकांना रोजगार देण्याची घोषणा

Next

टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे. तब्बल 10,000 लोकांना रोजगार देणार असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे कॉलेज डिग्रीशिवायच टेस्लामध्ये (Tesla) नोकरीची संधी मिळणार आहे. एलन मस्क यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. ऑस्टिन येथे तयार होत असणाऱ्या टेस्ला मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 2022 पर्यंत 10,000 हून अधिक लोकांना काम देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. 

विद्यार्थ्यांना टेस्लासोबत काम करण्यासाठी कॉलेज डिग्रीची आवश्यकता नाही. विद्यार्थी हाय स्कूलनंतर या प्लांटमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात. एलन मस्क यांनी याआधी जुलैमध्ये कंपनीचं कन्स्ट्रक्शन काम नवीन मॅन्युफॅक्चरिंग सुविधेसह वेगात सुरू असल्याची घोषणा केली होती. ऑस्टिन अमेरिकन-स्टेट्समॅनच्या एका रिपोर्टनुसार, जर टेस्लाने 10000 वर्कर्सला रोजगार दिला, तर कंपनीकडून आधी सांगण्यात आलेल्या वर्कर्सच्या किमान संख्येच्या दुप्पट ही संख्या असेल. वर्कर्स संख्या आधी 5000 होती.

एलन मस्क यांनी आपल्या ट्वीटमध्ये नव्या गीगा टेक्सासमध्ये जॉब करण्याचे फायदे असल्याचं म्हटलं आहे. नोकरीचं ठिकाण हे एअरपोर्टपासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आहे, जे सिटीपासून 15 मिनिटांवर कोलोराडो नदीजवळ आहे. कंपनीचे एक रिक्रूटिंग मॅनेजर क्रिसरॅली यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने ऑस्टिन कम्युनिटी कॉलेज, ह्युस्टन-टिलॉट्सन विद्यापीठ, टेक्सास विद्यापीठाशी संपर्क केला आहे. कंपनी त्या विद्यार्थ्यांना रिक्रूट करण्याबाबत विचार करत आहे, ज्यांना आपलं शिक्षण सुरू असतानाच टेस्लामध्ये करियर करायचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: elon musk promises to give 10 thousand jobs in tesla college degree will not be required for job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.