शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

एलॉन मस्क यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन; कोणत्या सदस्याने मांडला प्रस्ताव? वाचा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 08:12 IST

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्स व एक्स सारख्या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.

वॉशिंग्टन : नोबेल पुरस्कार (Nobel Prize) हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी नोबेल पुरस्काराचे वितरण केले जाते. दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्स व एक्स सारख्या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.

स्लोव्हेनियाचे युरोपियन संसद सदस्य (MEP) ब्रँको ग्रिम्स यांनी अधिकृतपणे एलॉन मस्क यांना 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ब्रँको ग्रिम्स यांच्या म्हणण्यानुसार, एलॉन मस्क यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी समर्थन दिले आहे. तसेच, जागतिक शांतता राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे एलॉन मस्क यांना या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.

या प्रस्तावाला ब्रँको ग्रिम्स यांनी दुजोरा दिला आणि सांगितले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूलभूत मानवी अधिकार आणि शांततेसाठी सातत्याने समर्थन करणाऱ्या एलॉन मस्क यांना २०२५ साठी शांतता नोबेल पुरस्कार मिळावा, असा आज यशस्वीपणे प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच, या नामांकनासाठी पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकांचे ब्रँको ग्रिम्स यांनी आभार मानले. या आव्हानात्मक प्रस्तावासाठी मदत करणाऱ्या सर्व समर्थकांचे आणि सहकाऱ्यांचे मनापासून आभार, असे ब्रँको ग्रिम्स म्हणाले.

सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी नोबेल पुरस्काराचे वितरण केले जाते. नोबेल पुरस्कार हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रातल्या कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. नोबेल पुरस्कार विजेत्यांना सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्रासह मोठी रक्कम दिली जाते.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कNobel Prizeनोबेल पुरस्कारInternationalआंतरराष्ट्रीय