ट्युनिशियात अध्यक्षपदाची निवडणूक
By Admin | Updated: November 24, 2014 02:26 IST2014-11-24T02:26:39+5:302014-11-24T02:26:39+5:30
ट्युनिशियात २०११ मध्ये झालेल्या क्रांतीनंतर प्रथमच रविवारी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. ट्युनिशियातील क्रांतीनंतरच अरब जगतात राजकीय परिवर्तनाची मोठी लाट आली होती.

ट्युनिशियात अध्यक्षपदाची निवडणूक
ट्यूनिस : ट्युनिशियात २०११ मध्ये झालेल्या क्रांतीनंतर प्रथमच रविवारी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. ट्युनिशियातील क्रांतीनंतरच अरब जगतात राजकीय परिवर्तनाची मोठी लाट आली होती.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात २७ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. ५३ लाख नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे.
२७ उमेदवारांमध्ये माजी पंतप्रधान बेजी कायद एसेब्सी हे सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार म्हणून समोर आले आहेत.
८७ वर्षी बेजी कायद एसेब्सी यांची इस्लामिस्टविरोधी पार्टी ‘नदा टाऊनेस’ने गेल्या महिन्यात झालेल्या संसदीय निवडणुकीत घवघवीत यश मिळविले होते. न्यायाधीश कालथौम कन्नो या निवडणूक रिंगणातील एकमेव महिला उमेदवार आहेत. (वृत्तसंस्था)