आठ वर्षांच्या मुलाने खरेदी केले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2017 00:36 IST2017-04-23T00:36:32+5:302017-04-23T00:36:32+5:30

घर खरेदी करण्यासाठी काय करावे लागत नाही? आयुष्यभर कष्ट करूनही अनेकांना घर खरेदी करता येत नाही, पण आठ वर्षांचा असाही एक मुलगा आहे, ज्याने काही दिवसां

An eight-year-old son bought a house | आठ वर्षांच्या मुलाने खरेदी केले घर

आठ वर्षांच्या मुलाने खरेदी केले घर

लंडन : घर खरेदी करण्यासाठी काय करावे लागत नाही? आयुष्यभर कष्ट करूनही अनेकांना घर खरेदी करता येत नाही, पण आठ वर्षांचा असाही एक मुलगा आहे, ज्याने काही दिवसांपूर्वीच घर खरेदी केले आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण लंडनमधील टेलर फोर्ड या मुलाची ही यशोगाथा ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहाणार नाहीत. किक बॉक्सिंगमधला हा चॅम्पियन म्हणून ओळखला जातो. एवढेच काय, खेळानंतर आता हॉलीवूडमध्ये मोठ्या पडद्यावरही तो स्टार झाला आहे. त्याची लोकप्रियता एवढी वाढली आहे की, साऱ्या सुविधा त्याच्यापुढे हात जोडून उभ्या आहेत. लंडनमध्ये याच मुलाने आपले महागडे घर खरेदी केले आहे. जर्मनमधील स्पर्धाही त्याने अलीकडेच जिंकली आहे. ‘हात लावेल तिथे सोने’ अशी त्याची ओळख झाली आहे. शाळेत जाण्यापूर्वीच तो पहाटे उठून बॉक्सिंगचा सराव करतो. या वयातील त्याची मेहनत आणि यश डोळे दीपवणारे आहे.

Web Title: An eight-year-old son bought a house