शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘एच-१ बी’ व्हिसाला आठ महिन्याची मुदतवाढ, भारतीयांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 03:06 IST

अमेरिकेचा निर्णय : भारतीयांना फायदा

वॉशिंग्टन : कोरोनाच्या साथीमुळे अमेरिकेतील स्थलांतरितांसमोर निर्माण झालेल्या समस्यांची जाण ठेवून ‘एच-१ बी’ व्हिसाची मुदत आठ महिन्यांनी वाढविण्यास परवानगी देण्याचा निर्णय अमेरिकी सरकारने घेतला आहे. त्याचा सर्वात मोठा फायदा अमेरिकेत काम करणारे भारतीय आयटी इंजिनिअर व बी१/बी२ प्रकारच्या व्हिसावर त्या देशात गेलेल्या व कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय पर्यटकांनाही होणार आहे.

अमेरिकेमध्ये एच-१बी व्हिसाधारकांपैकी एकतृतीयांश लोक भारतीय आहेत. तिथे काम करणारे व एच-१ बी’ व्हिसाची मुदत संपत आलेले भारतीय आयटी इंजिनिअर व अन्य नोकरदार या निर्णयामुळे खूश झाले आहेत. कोरोनाच्या साथीमुळे अमेरिकेत वाहतूक तसेच संचारावर निर्बंध लादण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह स्थलांतरितांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हेही लक्षात घेऊन मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला. नॅसकॉम या संघटनेच्या जागतिक व्यापार विभागाचे उपाध्यक्ष शिवेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने एच-१ बी’ व्हिसाच्या मुदतवाढीबद्दल निर्णय घेतला आहे.नोकरी शोधासाठी उसंतकोरोनाच्या संकटकाळात अमेरिकेत ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यांना व्हिसामध्ये मुदतवाढ मिळवून नवी नोकरी शोधण्याची उसंत मिळणार आहे. या देशात एच-१ बी व्हिसा मिळण्याचे नियम आणखी कडक करण्यात आले होते. अमेरिका व अमेरिकी नागरिकांना प्राधान्य या धोरणानुसार डोनाल्ड ट्रम्प सरकारने हे पाऊल उचलले होते.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसाIndiaभारत