शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Egypt Church Fire: इजिप्तमध्ये चर्चला भीषण आग; चेंगराचेंगरीत लहान मुलांसह किमान 41 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 17:48 IST

Egypt Church Fire: आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. प्राथमिक तपासात इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Egypt Church Fire: इजिप्तमध्ये एका चर्चला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीदरम्यान चेंगराचेंगरी होऊन, 41 जणांचा मृत्यू झाला आहे. इजिप्तच्या कॉप्टिक चर्चने दिलेल्या माहितीनुसार, कैरोमधील चर्चला आग लागल्याने किमान 41 लोक ठार झाले आणि 14 जखमी झाले. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. प्राथमिक तपासात इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

सविस्तर माहिती अशी की, इजिप्तची राजधानी कैरो येथील कॉप्टिक ख्रिश्चन चर्चमध्ये रविवारी भीषण आग लागून 41 जणांचा मृत्यू झाला. अधिकार्‍यांनी सांगितले की, कैरोच्या वायव्येकडील कामगार-वर्गीय जिल्हा इंबाबाबा येथील अबू सिफायन चर्चमध्ये भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलिसांच्या तपासात इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. रविवारी सकाळी कॉप्टिक ख्रिश्चन समाजाची बैठक सुरू असताना आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. 

कॉप्टिक ख्रिश्चन कोण आहेत?कॉप्टिक ख्रिश्चन हा मध्य पूर्वेतील सर्वात मोठा ख्रिश्चन समुदाय आहे. यांची लोकसंख्या इजिप्तच्या 103 दशलक्ष लोकांपैकी किमान 10 दशलक्ष आहे. कॉप्टिक ख्रिश्चनांना अनेकदा हल्ले आणि भेदभावाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, इजिप्तमध्ये गेल्या काही वर्षात अनेक आगीच्या घटना घडल्या आहेत. मार्च 2021 मध्ये कैराच्या पूर्व उपनगरात एका कपड्याच्या कारखान्याला आग लागून 20 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी, 2020 मध्ये दोन रुग्णालयांना आग लागल्याने 14 कोविड-19 रुगणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता.

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयfireआगDeathमृत्यू