इजिप्तमध्ये हल्ला; १३ पोलीस ठार

By Admin | Updated: March 21, 2016 02:46 IST2016-03-21T02:46:38+5:302016-03-21T02:46:38+5:30

इजिप्तमधील अशांत सिनाई प्रांतात एका सुरक्षा चौकीवर ‘इसिस’च्या अतिरेक्यांनी मोटारबॉम्ब फेकल्याने कमीत कमी १३ पोलीस ठार आणि अन्य काही जण जखमी झाले.

Egypt attacks; 13 police killed | इजिप्तमध्ये हल्ला; १३ पोलीस ठार

इजिप्तमध्ये हल्ला; १३ पोलीस ठार

कैरो : इजिप्तमधील अशांत सिनाई प्रांतात एका सुरक्षा चौकीवर ‘इसिस’च्या अतिरेक्यांनी मोटारबॉम्ब फेकल्याने कमीत कमी १३ पोलीस ठार आणि अन्य काही जण जखमी झाले.
अल-आरिश या शहरात ही घटना घडली. ‘इसिस’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. घटना घडलेल्या ठिकाणाला सुरक्षा फौजांनी वेढा घातला असून, हल्लेखोरांना पकडण्यासाठी त्यांनी मोहीम उघडली असल्याचे इजिप्तच्या गृहमंत्रालयातर्फे सांगण्यात आले.
दोन दिवसांपूर्वीच रफाट शहरात लष्कराच्या एका तपासणी चौकीवर अतिरेक्यांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यात पाच सैनिक ठार, तर अन्य ८ जण जखमी झाले होते.

Web Title: Egypt attacks; 13 police killed