चंद्रावर उतरणारे एडगर मिशेल कालवश

By Admin | Updated: February 7, 2016 01:45 IST2016-02-07T01:45:03+5:302016-02-07T01:45:03+5:30

अपोलो-१४ मोहिमेतील एक अंतराळवीर व चंद्रावर भ्रमण केलेल्या १२ जणांपैकी एक असलेले एडगर मिशेल यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीय आणि नासातर्फे

Edgar Mitchell Calvash, who descended on the moon | चंद्रावर उतरणारे एडगर मिशेल कालवश

चंद्रावर उतरणारे एडगर मिशेल कालवश

वॉशिंग्टन : अपोलो-१४ मोहिमेतील एक अंतराळवीर व चंद्रावर भ्रमण केलेल्या १२ जणांपैकी एक असलेले एडगर मिशेल यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीय आणि नासातर्फे ही माहिती देण्यात आली.चंद्रावर आतापर्यंत केवळ १२ जणांनीच पाऊल ठेवले असून, त्यात मिशेल यांचा समावेश होता.मिशेल गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांचे गुरुवारी निधन झाले. शुक्रवारी चंद्रावर अपोलो-१४ यान उतरण्यास ४५ वर्षे पूर्ण होणार होते. चंद्रावर गेलेल्या अपोलो-१४ या यानात ए. शेफर्ड ज्युनियर आणि स्टुअर्ट रोसा हेही सामील झाले होते. रोसा यांचे १९९४ मध्ये तर शेफर्ड यांचे १९९८ मध्ये निधन झाले. त्या मोहिमेत मिशेल हे एकमेव जिवंत सदस्य होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून, त्यात ‘द वे आॅफ एक्स्प्लोरर’चा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Edgar Mitchell Calvash, who descended on the moon