शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

हवामान बदलामुळे पृथ्वी झाली डळमळीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 17:05 IST

विसाव्या शतकामध्ये पृथ्वीवरील विविध घटनांमुळे, औद्योगिकरणामुळे पृथ्वीवरील तापमान वाढत गेले आणि त्यामुळे ग्रीनलँडवरील बर्फ वितळले. या कालावधीमध्ये ७५०० गिगाटन म्हणजे अमेरिकेतील एम्पायर स्टेट इमारतीच्या आकाराइतक्या २ कोटी इमारती एकत्र केल्यास जेवढा आकार होईल तितका बर्फ वितळला आहे.

न्यू यॉर्क- पृथ्वी ही आपल्या आसाभोवती फिरत असते. पृथ्वीचा आस म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाला जोडणारी काल्पनिक रेषा. गेल्या शतकभरामध्ये पृथ्वीचा आस ४ इंचांनी हलला आहे आणि ग्रीनलँडमधील हिमखंड मोठ्या प्रमाणात वितळले आहेत. या दोन्ही कारणांमुळे पृथ्वी डळमळीत झाल्याचे अमेरिकन संशोधन संस्था नासाने म्हटले आहे.     विसाव्या शतकामध्ये पृथ्वीवरील विविध घटनांमुळे, औद्योगिकरणामुळे पृथ्वीवरील तापमान वाढत गेले आणि त्यामुळे ग्रीनलँडवरील बर्फ वितळले. या कालावधीमध्ये ७५०० गिगाटन म्हणजे अमेरिकेतील एम्पायर स्टेट इमारतीच्या आकाराइतक्या २ कोटी इमारती एकत्र केल्यास जेवढा आकार होईल तितका बर्फ वितळला आहे. समुद्राची पातळी वाढण्यामध्ये ग्रीनलँडचा मोठा वाटा आहे. त्यामुळे समुद्रजलात वाढ झाली आणि पृथ्वीचा आस ढळण्यास मदत झाली असे नासाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे. याचाच अर्थ मनुष्यामुळे वातावरण बदल आणि पर्यायाने समुद्रपातळीत वाढ झाली व शेवटी पृथ्वीच डळमळीत झाली असा निष्कर्ष काढता येतो.तज्ज्ञांच्या मते ग्रीनलँड आणि अंटार्क्टीका येथिल बर्फ वितळण्याचा पृथ्वीच्या आासावर अधिक परिणाम झाला आहे. ध्रुवापासून ४५ अंशावर असणारे हिमखंड वितळल्यास (उत्तरेस ग्रीनलँड आणि दक्षिणेस पॅटागोनिया ग्लेशियर्स) पृथ्वीच्या आसावर अधिक परिणाम होतो मात्र ध्रुवाजवळील बर्फ वितळल्यास तितका परिणाम होत नाही, असे या शोधनिबंधाचे सहलेखक एरिक इविन्स यांनी सांगितले.ग्लेशियर्स म्हणजे हिमनद्या वितळणे किंवा त्यांचे आकारमान कमी होण्याचाही पृथ्वीच्या डळमळीत होण्यावर परिणाम होतो असे हे संशोधक म्हणतात मात्र हिमनद्या वितळणे हे मुख्य कारण नाही असेही त्यांनी नमूद केले आहे. शेवटच्या हिमयुगामध्ये वजनदार हिमनद्यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर मोठा दाब दिला. आपण गादीवर अंग टेकल्यावर वजनामुळे कशी ती खाली जाते आणि पसरते त्याचप्रमाणे हिमनद्यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर दाब दिला होता. त्यांचे वजन कमी झाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा आपल्या मूळ जागेवर येतो. त्यामुळेही पृथ्वी दोलायमान होते. पृथ्वीवरील भूखंडवहनामुळेही ती दोलायमान होते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भूखंड हे पृथ्वीच्या गाभ्यातील उष्णतेमुळे सरकत असतात. आपण एखाद्या पातळ पदार्थाचे भांडे उकळायला ठेवल्यावर त्यात उष्णतेच्या स्रोतापासून उर्ध्वगामी हालचाल सुरु होते. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या गाभ्यातील उष्णतेमुळे भूखंडांचे वहन असते. पृथ्वीच्या परिवलनामध्ये फरक पडल्यामुळे आपल्या रोजच्या आयुष्यात काय फरक पडेल यावर  या संशोधकांनी फारसा फरक पडणार नाही असे उत्तर दिले. मात्र जीपीएसच्या अचूकतेत आणि उपग्रहांच्या कार्यावर थोडा परिणाम होईल असे नासाचे संशोधक म्हणतात. 

टॅग्स :Earthपृथ्वीscienceविज्ञान