शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामिक देशांच्या मंचावरून सुषमा स्वराज यांचे पाकिस्तानला खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 13:52 IST

भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज 57 मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशन (OIC) ला संबोधित केले.

अबू धाबी - भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज 57 मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशन (OIC) ला संबोधित केले. यावेळी भारताकडून दहशतवादाविरोधात उघडलेल्या मोहिमेवर बोलताना सुषमा स्वराज यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानवर नाव न घेता निशाणा साधला. दहशतवादाविरोधातील लढाई ही कुठल्याही एका धर्माविरोधात नसल्याचेही स्वराज यांनी स्पष्ट केले. इस्लामिक देशांच्या महत्त्वाच्या परिषदेत गेस्ट ऑफ ऑनर म्हणून निमंत्रण मिळाल्याने सुषमा स्वराज यांनी आभार मानले. दुसरीकडे या बैठकीत भारताला निमंत्रण मिळाल्याने जळफळाट झालेल्या पाकिस्तानने या संमेलनावर बहिष्कार टाकला आहे. 

ओआयसीचे निमंत्रण आणि गेस्ट ऑफ ऑनरचा मान मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केल्यानंतर सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला घेरले. ''भारत दहशतवादाशी झुंजत आहे. दिवसेंदिवस जगभरात दहशतवाद फोफावत आहे. दक्षिण-पूर्व आशियामध्ये तर दहशतवाद आणि उग्रवाद चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे, असे सुषमा स्वराज म्हणाल्या. दहशतवादाविरोधातील लढाई ही कुठल्याही धर्माविरोधातील लढाई नाही. अल्लाचा अर्थ शांती असा होतो. मात्र दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या, आसरा देणाऱ्या देशांविरोधात कारवाई झाली पाहिजे. दहशतवादी संघटनांना होणारी फंडिंग थांबली पाहिजे, असे आवाहनही सुषमा स्वराज यांनी यावेळी केले. 

 संस्कृतींचे आदान-प्रदान झाले पाहिजे. सध्याच्या घडीला खरेदी क्षमतेच्या दृष्टीने भारत ही सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताच्या पूर्वेला असलेले ब्रुनोई, इंडोनेशिया आणि मलेशिया हे आमच्या अॅक्ट ईस्ट पॉलिसीचे महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत. तसेच बांगलादेश, अफगाणिस्तान, मालदीव आदी देशांशी आमचे चांगले संबंध आहेत, असेही सुषमा स्वराज यांनी यावेळी सांगितले. 

जर आपल्याला मानवतेला वाचवायचे असेल तर आपल्याला दहशतवादाला आसरा आणि अर्थपुरवठा करणाऱ्या देशाला हे प्रकार थांबवण्यास सांगावे लागेल. तसेच तिथे असलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणावा लागेल, असेही स्वराज यांनी स्पष्ट केले. 

 

 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजIndiaभारतPakistanपाकिस्तानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक